प्रकाश आंबेडकरांकडून जनतेची दिशाभूल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई: लोकसभेत वेगळे लढले असताना आम्ही अमुक जागा देतो असे सांगून टीव्ही, वर्तमानपत्रात चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी केला. 

आंबेडकर यांनी साेमवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही, असे सांगितले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मलिक म्हणाले, आंबेडकर हे लोकसभेत वेगळे लढले होते. त्यांना आमच्याशी आघाडी नकोच आहे.

आता विधानसभेलाही त्यांना वेगळेच लढायचे आहे. वंचितमुळे मतविभाजन होऊन त्याचा फायदा शिवसेना-भाजपला होत असल्याचे राज्यातील जनतेला कळून चुकले आहे. जनतेने लोकसभेत जी चूक केली ती पुन्हा विधानसभेत करणार नाहीत.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी विधानसभेत मित्रपक्षांना सोबत घेऊन ताकदीने लढवणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर लाईव्ह 24