महापूर आणि दुसरीकडे दुष्काळ ही समस्या आता कायमस्वरूपी सोडवणार!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

सांगली : एका बाजुला महापूर आणि दुसरीकडे दुष्काळ ही सांगली जिल्ह्याची समस्या आता कायमस्वरूपी सोडवणार आहे. पूराचे पाणी कॅनालच्या माध्यमातून वळवून दुष्काळी भागाला देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत केली.

जागतीक बॅँकेने या योजनेला तत्वत: मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगीतले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सोमवारी सायंकाळी सांगलीत आली. या यात्रेचे आ. सुधीर गाडगीळ यांच्यासह भाजप नेते, कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोषात स्वागत केले.

पुष्पराज चौकात मुख्यमंमर्त्यांची सभा झाली झाली. ते म्हणाले, सांगली, कोल्हापूर, कराडचे महापूराने आतोनात नुकसान झाले. या संकटात सरकार पूरगस्त जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे.

२००५ च्या महापूरानंतर कॉग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने दिलेल्या मदतीपेक्षा आमच्या सरकारने मोठ्या प्रमाणात मदत केली. पूरग्रस्त भागात पायाभुत सुविधा तसेच पूराच्या काळात रस्ते, पाणी व वीज बंद होणार नाही, याची व्यवस्था तसेच ज्यांची घरे वारंवार पाण्यात जातात त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.

यासाठीच जागतीक बॅँकेसह २२ आंतरराष्ट्रीय तज्ञ व एशियन बॅँकेच्या प्रतिनिधीना पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यास सांगीतले होते. त्यांनी पाहणीनंतर अहवाल दिला असून जागतीक बॅँकेच्या प्रतिनिधीशी माझी चर्चा झाली आहे. महापूराचे पाणी डायव्हर्जन कॅनॉलने वळवून दुष्काळी भागाला देण्यात येणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24