नाशिकवरून आता देशातील या 30 शहरांना पोहोचता येईल काही तासात! नाशिकसाठी विमान सेवेचे नवीन शेड्युल जाहीर

Ajay Patil
Published:
indigo airlines

विमानाने प्रवास करणे अगोदर श्रीमंत लोकांचे काम आहे असे समजले जायचे. परंतु आता गेल्या काही वर्षापासून यामध्ये झपाट्याने बदल होताना दिसून येत असून ग्रामीण भागातील लोक देखील आता मोठ्या प्रमाणावर विमान प्रवास करू लागले आहेत.

विमान प्रवासाच्या माध्यमातून कमीत कमी वेळेमध्ये देशाच्या कुठल्याही ठिकाणी वेगात पोहोचता येणे शक्य होते. तसेच अनेक विमान कंपन्यांनी स्वस्त तिकीट दरामध्ये विमान प्रवासाची सोय प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली असल्याने विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे.

आधी याच अनुषंगाने जर आपण नाशिक शहराचा विचार केला तर नाशिक हे एक वेगाने विकसित होत असलेले शहर असून या शहराची देशातील इतर महत्त्वाच्या शहरांशी कनेक्टिव्हिटी  वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असे विमानतळावरून देशातील विविध शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू व्हावी अशा पद्धतीचा प्रयत्न या

ठिकाणच्या उद्योजकांकडून केला जात होता व या पद्धतीची मागणी देखील केली जात होती. या मागणीला प्रतिसाद देत इंडिगो एअरलाइन्स कंपनीने नाशिक विमानतळावरून देशातील तब्बल 30 महत्त्वाच्या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 नाशिकमधून सुरू होणार देशातील 30 शहरांना जोडणारी विमानसेवा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंडिगो एअरलाइन्स कंपनीकडून  नाशिक येथून देशातील 30 महत्त्वाच्या शहरांना जोडणारी विमान सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून यानुसार आता उत्तर गोवा,अहमदाबाद, नागपूर,

इंदोर आणि हैदराबाद या शहरांमध्ये थेट सेवा सुरू करण्यात येणार आहे तर उर्वरित जी शहरे आहेत ते हैदराबाद व अहमदाबाद मार्गे जोडली जाणार आहेत. एवढेच नाही तर या कंपनीकडून नाशिकसाठी विमानसेवीचे हे नवीन वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.

यामध्ये उत्तर गोवा, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, इंदूर या प्रमुख शहरांसाठी थेट सेवा मिळणार आहे. यामध्ये इंदुरकरिता आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस सेवा उपलब्ध असणार आहे तर उर्वरित शहरांसाठी दररोज विमान सेवा सुरू राहणार आहे.

तसेच अमृतसर जायचे असेल तर याकरिता अहमदाबाद मार्गे  मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार असे चार दिवस सेवा राहणार असून बेंगलोर साठी हैदराबाद मार्गे दररोज सेवा दिली जाणार आहे. तसेच भोपाल करिता अहमदाबाद मार्गे सोमवार व मंगळवार, गुरुवार ते रविवार असे सहा दिवस सेवा उपलब्ध असणार आहे.

 हैदराबाद मार्गे जोडली जाणार ही महत्त्वाची शहरे

इंडिगो कंपनीने जे काही नवीन शेड्युल जाहीर केले आहे त्यामध्ये हैदराबाद मार्गे प्रवाशांना भुवनेश्वर, कोईमतुर, चेन्नई, दिल्ली, कोची, जयपुर आणि कोलकत्ता या शहरांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे तर लखनऊसाठी देखील हैदराबाद मार्गे जाता येणार आहे.

तसेच रायपूर, मंगळूर, कोझीकोड, राजमुंद्री, तिरुअनंतपुरम, चंदीगड, अमृतसर, विजयवाडा आणि कोची या शहरांना दररोज हैदराबाद मार्गे सेवा दिली जाणार आहे.

 अहमदाबाद मार्गे जाता येईल दिल्ली

नाशिककरांना दिल्ली जाता यावे याकरिता नाशिकहून अहमदाबाद मार्गे दिल्ली जाण्यासाठी सेवा दिली जाणार आहे. याकरिता दिल्लीहुन सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी विमान टेकऑफ करेल तर अहमदाबाद मार्गे बुधवारी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी नाशिकला हे विमान उतरेल.

अशा पद्धतीने आता ही विमानसेवा सुरू झाल्यामुळे औद्योगिक दृष्टिकोनातून देखील याचा खूप मोठा फायदा नाशिकला आणि परिसराला होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe