बागायती 10 आणि जिरायती 20 गुंठे खरेदी-विक्रीला परवानगी, वाचा कोणत्या जिल्ह्यात लागू आहे हा आदेश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बऱ्याचदा शेतकऱ्यांमध्ये जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात. काही आर्थिक कारणांमुळे असले व्यवहार पार पडतात. यामध्ये बरेच शेतकरी दहा ते वीस गुंठे या प्रमाणामध्ये जमिनीची खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. परंतु यामध्ये जर आपण विचार केला तर तुकडेबंदी कायद्यानुसार इतक्या कमी क्षेत्राची म्हणजेच अर्धा एकर पर्यंत क्षेत्राची खरेदी विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले होते व त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यायला लागत होते. परंतु आता शासनाच्या माध्यमातून जिरायती व बागायती जमिनीच्या खरेदी विक्रीवरील जे काही  निर्बंध होते ते आता उठवण्यात आले आहेत.

 बागायती 10 आणि जिरायती वीस गुंठे जमिनीची करता येणार खरेदी विक्री

याबाबत सविस्तर वृत्त असे की आता, राज्यातील एकूण जिल्ह्यांपैकी तब्बल 32 जिल्ह्यांमध्ये वीस गुंठे म्हणजेच अर्धा एकर जिरायती व दहा गुंठे बागायती जमिनीची खरेदी विक्री करता येणे आता शक्य होणार आहे. याबाबत शासनाच्या माध्यमातून नवीन आदेश काढण्यात आला असून यानुसार आता या प्रमाणात असलेल्या क्षेत्राच्या खरेदी विक्रीसाठी कोणत्याही स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नाही. परंतु जर यापेक्षा कमी क्षेत्राचा व्यवहार करायचा असेल तर मात्र प्रांताधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

 राज्यातील या 32 जिल्ह्यांमध्ये लागू आहे हा आदेश

शासनाच्या नवीन आदेशानुसार आता बागायती 10 तर जिरायती वीस गुंठे म्हणजेच अर्धा एकर क्षेत्राची खरेदी विक्री करता येणार असून राज्यातील वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, सोलापूर, यवतमाळ, वासिम, बुलढाणा, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जळगाव, धुळे, नंदुरबार, नासिक, अहमदनगर, सातारा, नांदेड, परभणी, पुणे, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, जालना, लातूर, हिंगोली,बीड,

छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये आता शेतकऱ्यांना किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला दहा गुंठे बागायती व वीस गुंठे जमिनीची खरेदी विक्री कुठल्याही परवानगीविना करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे या मधून अकोला व रायगड हे दोन जिल्हे मात्र वगळण्यात आलेले आहेत. तसेच हा नवा बदल महानगरपालिका किंवा नगरपरिषदा, नगरपालिका क्षेत्रांना लागू नाही.