Panjabrao Dakh : राज्यात पाऊस कोसळणार? वाचा सविस्तर पंजाबरावांचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh : यावर्षी पावसाळी (Monsoon) काळात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. एवढेच नाही तर परतीचा पाऊस देखील या वर्षी चांगलाच बरसला आहे. पावसाळी (Monsoon News) काळात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले.

खरीप हंगामातील ऐन वाढीच्या अवस्थेतील पिकांना मोठा फटका बसला. यातून कसेबसे शेतकऱ्यांनी आपले पीक वाचवले, मात्र नियतीला काही औरच मान्य होते. शेवटी परतीच्या पावसामुळे (Rain) खरीप हंगामातील पिकांची राखरांगोळी झाली.

यामुळे शेतकरी बांधवांना लाखो रुपयांचा भुर्दंड बसला आहे. दरम्यान आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे मानसून राज्यातून माघारी फिरला असून परतीच्या पावसाला ब्रेक लागला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते आता राज्यात हवामान कोरडे राहणार आहे.

राज्यात आता थंडीला देखील सुरुवात होणार आहे. वाढती थंडी शेतकऱ्यांसाठी फायद्याची राहणार आहे. सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग करत असून बहुताशी ठिकाणी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू झाली आहे.

शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामासाठी आवश्यक पूर्व मशागतीची कामे देखील आता आटपायला सुरुवात केली पाहिजे. दरम्यान पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांच्या मते आता राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. शेतकरी बांधवांच्या मते पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असून यामुळे त्यांचा फायदा होत आहे.

मित्रांनो आज दोन नोव्हेंबर आणि उद्या तीन नोव्हेंबर रोजी राज्यात ढगाळ वातावरण राहणार असले तरी देखील पाऊस पडणार नसल्याचे पंजाबराव डख यांनी स्पष्ट केले आहे. एकंदरीत आज आणि उद्या फक्त ढगाळ वातावरण तयार होणार आहे.

पाऊस पडत नसला तरी देखील ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. दरम्यान 4 नोव्हेंबर पासून पुन्हा हवामान पूर्ववत होणार असून राज्यात दिवसा कडक ऊन आणि रात्री तीव्र थंडी जाणवणार आहे. निश्चितच, राज्यात आता रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

पंजाबराव डख यांनी देखील राज्यात थंडीचा जोर वाढणार असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी पावसाळी काळात तसेच परतीच्या पावसात झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बी हंगामात तसेच उन्हाळी हंगामात पाण्याची कमतरता राहणार नाही.

निश्चितच पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरीदेखील याच पावसामुळे शेतकरी बांधवांना रब्बी हंगामात मोठा दिलासा मिळणार असून खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून काढता येणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.