पारनेर :- ‘राज्याला कर्जबाजारी करण्याचे काम या युती सरकारने केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. केंद्र व राज्य सरकारला शेतीमालाच्या भावाविषयी काही देणेघेणे नाही.
साखर कारखाने, कंपन्या बंद पडत आहेत. मोदी सरकारला जनसामान्यांच्या व देशाच्या प्रश्नांविषयी काही देणेघेणे नाही अशी टीका आ.सुधीर तांबे यांनी भाजप सरकारच्या कारभारावर केली.पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.