Petrol Diesel Prices : पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत नवीन अपडेट, अनेक शहरातील दर बदलले; पहा यादीत तुमचे शहर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Diesel Prices : आज शुक्रवार रोजी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती जाहीर केल्या आहेत. यामध्ये आज अनेक राज्यांमध्ये तेलाच्या किमतीत बदल झाला आहे.

मात्र, चेन्नई, कोलकाता या देशातील चार महानगरांमध्ये आजही तेलाच्या किरकोळ किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आज बिहारची राजधानी पटनामध्ये पेट्रोल 53 पैशांनी महागले आणि ते 108.12 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. डिझेलही 50 पैशांनी वाढले असून 94.86 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे दर

पुणे- 106. 61
रत्नागिरी – 107. 47
सांगली – 106. 05
सातारा – 106. 76
सोलापूर- 106. 77
ठाणे – 105. 77

कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर गेल्या 24 तासात त्याच्या किमतीत थोडा बदल झाला आहे. ब्रेंट क्रूडची किंमत थोडी कमी झाली आहे आणि प्रति बॅरल $75.46 वर चालू आहे. जागतिक बाजारात डब्ल्यूटीआयचा दरही घसरून प्रति बॅरल $69.45 झाला आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
– कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.