महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे हे दोन्ही शहरे महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे असून पुण्यावरून मुंबईसाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दररोज प्रचंड प्रमाणात असते. नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने तसेच इतर कारणांमुळे पुणे ते मुंबई दरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होत असते.
परंतु यामध्ये खरी अडचण जर पाहिली तर वाढत्या गर्दीच्या समस्या मुळे अनेक प्रवाशांना या दोन्ही शहरादरम्याचा प्रवास उभा राहूनच करावा लागतो. तसेच पुणे ते मुंबई एक्सप्रेसवे वर कायमच ट्रॅफिकची समस्या होत असते व प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे प्रवाशांचा बराच वेळ यामध्ये वाया जातो. हीच समस्या डोळ्यासमोर ठेवून या समस्येतून मुक्तता मिळवण्याकरिता काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात येत असून जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पुणे ते मुंबई हा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.
वाढत्या गर्दीवर या उपायोजना ठरतील फायद्याच्या
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे या ठिकाणहून मुंबईला रेल्वेमध्ये नेहमी गर्दी होत असते तसेच बऱ्याचदा प्रवाशांना हा प्रवास उभ्यानेच करण्याची वेळ येते. तसेच मुंबई ते पुणे एक्सप्रेसवेवर कायमच वाहतूक कोंडी होत असते व त्यामुळे प्रवाशांचा खूप मोठा वेळ वाया जातो. ही समस्या लक्षात घेऊन आता पुणे ते मुंबई हा महामार्ग आठ पदरी करण्यात येणार असून हीच गर्दीची समस्या सोडवण्याकरिता आता रेल्वे देखील पुढे सरसावली आहे.
जर रेल्वेचा विचार केला तर गर्दीची समस्या मिटावी याकरिता पुणे रेल्वे कडून देखील आता पुढाकार घेण्यात आला असून पुणे रेल्वे स्टेशनवर जे काही प्लॅटफॉर्म आहेत त्यांची आता लांबी वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे रेल्वेने घेतला असून त्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. सध्या आपण पाहिले तर पुणे रेल्वे स्टेशनवर 24 डब्यांच्या गाड्या उभ्या राहू शकतात.
परंतु प्लॅटफॉर्मची लांबी वाढवल्यानंतर या प्लॅटफॉर्मवर २६ डब्यांच्या गाड्या देखील उभे राहणे शक्य होणार आहे. त्यामुळे नक्कीच गर्दीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. पुणे रेल्वे स्टेशन वरील दोन व तीन आणि सहा नंबरच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम सध्या सुरू असून यावर सध्या फक्त 16 ते 18 डब्यांच्या रेल्वे गाड्या उभ्या राहू शकतात. परंतु सदरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवल्यानंतर यावर 26 डब्यांच्या गाड्या उभे राहणे शक्य होणार आहे. या कामासोबतच हडपसर या ठिकाणी टर्मिनल उभारण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे.
लोकलसाठी उभारण्यात येत आहे संगम पुलाजवळ नवीन टर्मिनल
पुणे रेल्वे स्टेशन जवळ जो काही संगम पूल आहे त्या ठिकाणी लोकलकरिता नवीन टर्मिनल उभारण्यात येणार असून मुंबई रेल विकास कार्पोरेशन कडून यासाठी जागा देखील निश्चित करण्यात आली आहे. यापुढे आता पुणे आणि लोणावळा दरम्यान ज्या काही लोकल सुटतात त्यांची संख्या देखील वाढणार आहे.
तसेच पुणे ते लोणावळा या मार्ग दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन टाकण्याचे काम देखील सुरू करण्यात आले असून या सगळ्या उपाययोजनांमुळे पुणे व मुंबई दरम्यान धावणाऱ्या रेल्वेची संख्या वाढणार आहे व याचा परिणाम हा पुणे ते मुंबई दरम्यान होणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी होण्यावर होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या उपाययोजना प्रवाशांसाठी फायदेशीर ठरतील व वाढत्या गर्दीची समस्या कमी होण्यास मदत होईल हे मात्र निश्चित.