Pune Special Train:- सध्या उन्हाळा सुरू झाला असून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते व त्यामुळे साहजिकच प्रवाशांच्या संख्येमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होते. त्यामुळे या वाढलेल्या प्रवासी संख्येचा अतिरिक्त ताण हा उपलब्ध असलेल्या रेल्वे गाड्यांवर मोठ्या प्रमाणावर होतो व प्रवाशांची गैरसोय होते.
त्यामुळे ही समस्या डोळ्यासमोर ठेवून प्रवाशांची उन्हाळ्याची सुट्ट्यांमध्ये गैरसोय टाळण्याकरिता पुण्याहून दानापूर, हजरत निजामुद्दीन आणि नागपूरकरिता उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत.
त्यामुळे निश्चितच अतिरिक्त गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना देखील याचा खूप मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
पुण्याहून सुटणाऱ्या उन्हाळी विशेष ट्रेन आणि वेळापत्रक
1- पुणे–दानापुर–पुणे– पुणे ते दानापूर ही सुपरफास्ट दिवसाप्ताहिक विशेष ट्रेन सुरू करण्यात येणार असून यामध्ये गाडी क्रमांक 01471 पुणे ते दानापुर सुपरफास्ट द्वि साप्ताहिक विशेष दिनांक 11 एप्रिल 2024, 14 एप्रिल 2024,2 मे 2024 आणि पाच मे 2024( गुरुवार आणि रविवार) रोजी पुण्याहून 06.30 वाजता सुटेल
आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजता दानापुरला पोहोचेल. त्यासोबत गाडी क्रमांक 01472 दानापूर ते पुणे सुपरफास्ट दिसप्ताहिक विशेष एक्सप्रेस दिनांक 12 एप्रिल 2024, 15 एप्रिल 2024, तीन मे 2024 आणि सहा मे 2024( शुक्रवार आणि सोमवार) रोजी दानापूर येथून 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 19.45 वाजता पुण्याला पोहोचेल.
या ट्रेनसाठी थांबे कोणते असतील?
ही विशेष ट्रेन हडपसर, दौंड कार्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छीवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या ठिकाणी थांबा असेल.
2- पुणे–नागपूर–पुणे– या विशेष ट्रेनमध्ये गाडी क्रमांक 01166 पुणे ते नागपूर सुपरफास्ट द्विसाप्ताहिक विशेष ट्रेन दिनांक 14 एप्रिल 2024 ते 16 जून 2024 प्रत्येक मंगळवार, रविवारी पुण्याहून 15.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 06.30 वाजता नागपूरला पोहोचेल.
तसेच गाडी क्रमांक 01165 नागपूर ते पुणे सुपरफास्ट द्वी साप्ताहिक विशेष ट्रेन दिनांक 13 एप्रिल 2024 ते 15 एप्रिल 2024 दरम्यान प्रति सोमवार, शनिवार नागपूरहून 19.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.25 वाजता पुण्याला पोहोचेल.
या ट्रेनला कुठे असतील थांबे?
उरळी, दौंड कार्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे असतील.
3- पुणे–हजरत निजामुद्दीन–पुणे– गाडी क्रमांक 01491 ही साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन दिनांक 12 एप्रिल 2024 ते 28 जून 2024 दरम्यान प्रत्येक शुक्रवारी पुणे येथून 17.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 16.45 वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचेल.
तसेच गाडी क्रमांक 01492 ही ट्रेन 13 एप्रिल 2024 ते 26 जून 2024 दरम्यान प्रत्येक शनिवारी हजरत निजामुद्दीन या ठिकाणहून 22.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 23.55 वाजता पुण्याला पोहोचेल.
या गाडीला कोणते थांबे असतील?
लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, बडोदा, रतलाम, भवानी मंडी, सवाई माधोपुर, कोटा आणि मथुरा हे थांबे असतील.
बुकिंग कसे करता येईल?
या गाड्यांमधील गाडी क्रमांक 01471,01165,01166 आणि 01491 साठीची बुकिंग दिनांक आठ एप्रिल पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.