देशामधील जे काही दारिद्र्य रेषेखालील गरजू लोक आहेत त्यांना घर मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील गरजू आणि गरीब असलेल्या सर्वांना स्वतःचे घर मिळावे यासाठी या योजनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येते व देशातील गरजू लोक या योजनेचे लाभार्थी ठरतात. या योजने करता ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येतो. या योजनेचे संपूर्ण माहिती आपण लेखात घेऊ.
प्रधानमंत्री आवास प्लस योजनेच्या माध्यमातून किती मिळते आर्थिक मदत?
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जे अर्जदार अर्ज करतील त्यांना त्यांच्या परिसराच्या आधारावर आर्थिक लाभ दिला जातो. म्हणजेच डोंगराळ भागाव्यतिरिक्त सपाट भागात राहणाऱ्या कुटुंबांना एक लाख वीस हजार रुपये पर्यंतचे आर्थिक मदत केली जाते तर डोंगराळ आणि दुर्गम भागात राहणाऱ्या कुटुंबांना एक लाख तीस हजार रुपये पर्यंतचे आर्थिक मदत या माध्यमातून मिळते.
पंतप्रधान आवास प्लस योजनेचा लाभ कसा घेता येतो?
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदाराला त्यांच्या जवळच्या पंचायत कार्यालयामध्ये आपला अर्ज करावा लागेल. अर्ज करून झाल्यानंतर त्या अर्जाची छाननी केली जाते आणि अर्जदाराला प्रत्यक्षात घराची गरज आहे की नाही हे देखील पाहिले जाते. तसेच फॉर्म किंवा अर्जामध्ये भरलेली माहिती जर बरोबर आढळली तर तो अर्जदार लाभार्थ्याच्या यादीत जोडला जातो व त्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
तुमचे देखील लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव आहे की नाही हे कसे पहावे?
या योजनेचे लाभार्थ्यांना लाभ मिळतो त्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीमध्ये दिसतात. तुम्हाला देखील तुमचे नाव लाभार्थ्यांची यादीत आहे की नाही हे पाहता येते व यासाठी एक सोपा मार्ग आहे व तो म्हणजे…
1- सर्वप्रथम तुम्ही या योजनेची जी वेबसाईट आहे तिला भेट द्यावी.
2- त्यानंतर मेनू बार मधील Awaassoft या पर्यायावर जाऊन त्या ठिकाणी रिपोर्ट ऑप्शन असलेल्या पेजवर यावे लागेल.
3- त्यानंतर सामाजिक लेखापरीक्षण अहवालाच्या पर्यायांमध्ये पडताळणीसाठी लाभार्थीच्या तपशिलावर येणे हा या पेजवरील शेवटचा पर्याय आहे.
4- त्यानंतर या पेजवर तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव तसेच जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आर्थिक वर्ष निवडणे गरजेचे आहे.
5- हे झाल्यानंतर तुम्हाला ही यादी आणि निवडलेल्या गावांची यादी पाहता येते. जर तुमची देखील यामध्ये लाभार्थी म्हणून निवड झाली असेल तर तुमचे नाव देखील या पेजवर तुम्हाला बघायला मिळते.
पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात?
जर तुमचे नाव या योजनेमध्ये नसेल आणि तुम्ही या योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला या योजनेकरिता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अर्ज करावा लागतो त्याकरता तुम्हाला काही कागदपत्रे आवश्यक असतात व ते म्हणजे…
आधार कार्ड क्रमांक, आधार वापरण्यासाठी वापरकर्त्याची संमती, अर्जदार मनरेगा नोंदणीकृत असेल तर त्याचा जॉब कार्ड क्रमांक, स्वच्छ भारत मिशन योजना लाभार्थीचा क्रमांक व बँक खात्याचा तपशील इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात.