उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वंदे भारत ट्रेनने गोव्याला जायचा प्लॅन आहे का? वाचा वंदे भारतचे वेळापत्रक आणि तिकीट दर

Ajay Patil
Published:
vande bharat train

भारतामध्ये अनेक महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि वेगवान प्रवास व्हावा याकरिता आरामदायी अशा वंदे भारत ट्रेन मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात येत आहेत. अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रात देखील सध्या मुंबई ते शिर्डी, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते मडगाव( गोवा) आणि नागपूर ते बिलासपुर या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.

वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून केला जाणारा प्रवास आरामदायी आणि वेगवान असल्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच वंदे भारत ट्रेनला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील दिला जात आहे. अगदी याच पद्धतीने जर तुम्हाला देखील या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गोव्यासारख्या ठिकाणी फिरायला जायचे असेल व तुम्ही कुटुंब, मित्रांसोबत ट्रीप प्लान केली असेल तर वंदे भारत ट्रेनने जाऊन तुम्ही या प्रवासाचा आनंद घेऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा आनंद द्विगुणित करू शकतात.

गोव्याला जाण्यासाठी मुंबईवरून वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा उपलब्ध आहे व कमीत कमी वेळेत गोव्यात पोहोचवण्यासाठी, आरामदायी प्रवासाकरिता ही वंदे भारत ट्रेन खूप महत्त्वाची आहे. मुंबई ते गोवा ही वंदे भारत ट्रेन आठवड्यातून सहा दिवस शुक्रवार वगळता मुंबई ते गोवा या मार्गावर धावते. जर आपण या वंदे भारत ट्रेनचे थांबे पाहिले तर ते दादर, ठाणे, पनवेल, खेड, कणकवली, रत्नागिरी आणि थिविम अशा स्थानकांवर थांबते. मुंबई ते गोवा प्रवासाचा कालावधी सात तास 45 मिनिटांचा आहे.

 कसे आहे मुंबई ते गोवा वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक?

ही ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस या ठिकाणाहून सकाळी 05:25 मिनिटांनी निघते आणि दादरला ही ट्रेन सकाळी पाच वाजून 32 मिनिटांनी पोहोचते व त्यानंतर ठाण्याला पोहोचायला सकाळचे पाच वाजून 52 मिनिटे या ट्रेनला लागतात. त्यानंतर खेड या ठिकाणी 8 वाजून 54 मिनिटांनी तर रत्नागिरीला सकाळी नऊ वाजून 45 मिनिटांनी वंदे भारत ट्रेन पोहोचते व कणकवली येथे सकाळी अकरा वाजून दहा मिनिटे, थिविमला बारा वाजून 16 मिनिटे आणि मडगाव येथे एक वाजून दहा मिनिटांनी पोहोचते.

 गोव्यावरून मुंबईला येताना वेळापत्रक

तसेच परतीच्या प्रवासाकरिता मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 22230 ही मडगाव हुन दुपारी दोन वाजून 40 मिनिटांनी निघते आणि मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी रात्री दहा वाजून 25 मिनिटांनी पोहोचते.

 मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर

1- दादर ते मडगाव चेअर कारचे तिकीट दर 1595 रुपये, एक्झिक्यूटिव्ह चेअर कारचे 3115 रुपये

2- ठाणे ते मडगाव चेअर कार तिकीट दर पंधराशे सत्तर रुपये, एक्झिक्युटिव्ह चेअर कार 3045 रुपये

3- कल्याण ते मडगाव चेअर कार तिकीट दर 1595 आणि एक्झिक्यूटिव्ह चेअर कार तिकीट दर 3115 रुपये

4- खेड ते मडगाव चेअर कारचे तिकीट दर 1185 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार 2265 रुपये

5- रत्नागिरी ते मडगाव चेअर कार 995 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार 1790 रुपये

6- थीवीम ते मडगाव चेअर कारचे तिकीट दर 435 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह चेअर कारचे 820 रुपये

7- मुंबई ते मडगाव चेयर कारचे 1595 रुपये तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे 3115 रुपये

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe