मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांवर भीक मागण्याची वेळ आणलीय…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदे :- पंधरा दिवसांच्या आत एफआरपी देण्याचा नियम असताना मुख्यमंत्र्यांनी अभय दिल्यामुळे साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांचे पेमेंट थकवले. कायदा पाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी झटकल्यामुळे शेतकऱ्यांना हक्काच्या पैशांची भीक मागण्याची वेळ आली, असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी मंगळवारी श्रीगोंदे येथे केला.

गेल्या तीन दिवसांपासून संभाजी ब्रिगेडसह ऊस उत्पादकांचे कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप आणि साईकृपा कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन सुरु आहे.

पाटील यांनी तेथे भेट देऊन राज्यभरातील शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. या वेळी शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, युवराज चिखलठाणे, संदीप कुनगर, घनश्याम गोडसे, दिलीप वाळुंज, दिलीप लबडे उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24