Surat-Chennai Expressway: कधी होईल सुरत-चेन्नई महामार्गासाठीचे भूसंपादन? या अडचणी ठरत आहेत अडसर! वाचा माहिती

Ajay Patil
Published:
surat-chennai greenfield highway

Surat-Chennai Expressway:- महाराष्ट्रामध्ये अनेक महामार्गांचे कामे सुरू असून काही महामार्ग हे इतर राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असताना त्यातील बराच भाग हा महाराष्ट्रातून जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांचा इतर राज्यातील महत्त्वाच्या शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या महामार्गांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

याच प्रकारे जर आपण गुजरात राज्यातील सुरत आणि दक्षिण भारतातील महत्त्वाचे असलेले शहर चेन्नई यांना जोडणारा सुरत ते चेन्नई हा महामार्ग महाराष्ट्रातून जाणार असून महाराष्ट्रातील देखील महत्त्वाच्या शहरांची कनेक्टिव्हिटी सुरत आणि चेन्नई या महत्वपूर्ण शहरांशी सुधारण्यास मदत होणार आहे.

सध्या महाराष्ट्रमध्ये जर आपण नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी सुरत- चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून त्यासंबंधीचीच एक अपडेट आपण या लेखात बघणार आहोत.

 सुरत ते चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादनात येत आहेत या अडचणी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बहुचर्चीत असलेला सुरत ते चेन्नई महामार्ग हा जिल्ह्यातून जात असून जवळजवळ नाशिक जिल्ह्यातील 609 गावांमधून हा महामार्ग जात आहे. या महामार्गाकरिता या ठिकाणहून 196 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे.

नाशिक जिल्ह्यामधून तब्बल 122 किलोमीटरचे अंतर या महामार्गाचे असणार आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा या महामार्गासाठी जे काही भूसंपादन करण्यात येत आहे त्याला खूप कमी प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. यामागील जर आपण कारणे पाहिली तर शेतकऱ्यांना जो काही मोबदलात देण्यात येत आहे तो कमीत कमी देण्यात येत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असून तो मोबदला वाढवून मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

दुसरा महत्त्वाचा अडसर म्हणजे काही जमिनींच्या सातबारावर एकापेक्षा अनेकांची नावे असल्याने संबंधित जमीन मालकांमध्येच एकमत होत नसल्याने देखील भूसंपादनाला अडसर निर्माण झालेला आहे. सुरत ते चेन्नई या दोन शहरांमधील जर अंतर पाहिले तर ते 1700 किलोमीटरचे आहे.

परंतु हा महामार्ग पूर्ण झाल्यामुळे हे अंतर 1250 किलोमीटर पर्यंत कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच नाशिक व सुरत या दोन्ही शहरांमधील अंतर 176 किलोमीटरवर आणता येणार आहे. म्हणजे जर तुम्हाला नाशिक वरून सुरतला जायचे असेल तर या महामार्गामुळे सुरत दोन तासात पोहोचता येणे शक्य होणार आहे.

 नाशिक जिल्ह्यातील या तालुक्यामधून जात आहे हा महामार्ग

नाशिक जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सुरत चेन्नई महामार्ग हा सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नासिक, निफाड आणि सिन्नर अशा सहा तालुक्यांमधून जाणार आहे व या ठिकाणी आता आवश्यक असलेल्या जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रामुख्याने नाशिक तालुक्याचा विचार केला तर या ठिकाणहून विंचूर गवळी, लाखलगाव तसेच आडगाव व ओढा या ठिकाणहून भूसंपादन केले जाणार आहे.

परंतु या ठिकाणी आतापर्यंत फक्त चार शेतकऱ्यांनी पैसे घेतले आहेत. परंतु बाकीच्या शेतकऱ्यांपैकी सातबारा उताऱ्यावर अनेकांचे नावे असल्याने एकमत होत नसल्यामुळे अडसर निर्माण होत आहे. या ठिकाणच्या काही शेतकऱ्यांना शासनाकडून भूसंपादनापोटी जो काही मोबदला मिळत आहे तो मान्य नाही. त्यामुळे हे महत्त्वाचे अडसर दूर होणे गरजेचे आहे.

 सुरतचेन्नई ग्रीनफीड प्रकल्पाचे एकंदरीत स्वरूप

जर या महामार्गाचा विचार केला तर दीड वर्षांमध्ये जमिनीचे संपादन करण्याची योजना असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढच्या तीन वर्षात हा महामार्ग कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. महामार्गाकरिता 196 हेक्टर जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील 69 गावांपैकी तेवीस गावांचा यामध्ये समावेश आहे.

सुरत चेन्नई महामार्गाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या वावी या ठिकाणी  समृद्धी महामार्ग आणि सुरत ते चेन्नई महामार्ग एकमेकांना छेदणार आहेत. महाराष्ट्रातून नाशिक तसेच अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातून हा प्रकल्प जाणार आहे.

सुरतहुन हा महामार्ग महाराष्ट्रामध्ये सुरगाणा तालुक्यातील राक्षसभूवन या ठिकाणी प्रवेश करणार आहे व सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या ठिकाणी संपणार आहे. सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग झाल्यामुळे नाशिक ते सोलापूर हे अंतर 50 किलोमीटरने कमी होण्यास मदत होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe