कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून बदली करणे किंवा बदली करून घेणे ही खूप महत्त्वाची गोष्ट असते व याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना प्रयत्न करावा लागतो. याचप्रमाणे एसटी महामंडळामध्ये जे काही चालत तसेच वाहक आणि अधिकाऱ्यांपर्यंत कर्मचारी आहेत त्यांच्या देखील बदल्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर होता.
बदल्यांमध्ये बऱ्याचदा विनंती बदल्या करण्यासाठी प्रयत्न केला जातो. परंतु आताची जी काही विनंती बदल्यांची प्रोसेस आहे यामध्ये विविध प्रकारचा हस्तक्षेप होतो व बदल्यांमध्ये अनियमितता देखील होत असते व या प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय मिळत नाही.
एवढेच नाहीतर बऱ्याच कर्मचाऱ्यांचे बदली संदर्भातले अर्ज अनेक वर्ष असेच पडून राहतात. म्हणून आता एसटी महामंडळाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून एसटी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या आता संगणकीय ॲप द्वारे होणार आहेत.
एस टी महामंडळातील सर्व विनंती बदल्या होतील संगणकीय ॲपद्वारे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एसटी महामंडळात नोकरीला असणारे चालक तसेच वाहक व अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या आता संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन केल्या जाणार आहेत.त्यामुळे वर्षानुवर्ष या बदल्यांच्या बाबत जे काही विविध आक्षेप होते ते कमी होण्यास मदत होणार आहे व याचा सगळ्यात मोठा फायदा हा सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी या पद्धतीने होणार आहे.
सध्या एसटी महामंडळामध्ये 87 हजार कर्मचारी कामाला असून एसटी महामंडळाचा सर्व आस्थापनांचा कारभार देखील अवाढव्य असा आहे. या सगळ्या आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी पती-पत्नी एकत्रीकरण किंवा गंभीर आजार, आपापसातील बदली अशा अनेक कारणांमुळे विनंती बदलीचा अर्ज त्यांच्या कार्यालयीन प्रमुखाकडे सादर करतात.
परंतु या प्रक्रियेमध्ये बऱ्याचदा विविध प्रकारचा हस्तक्षेप होतो किंवा बदल्यांमध्ये अनियमितता होत असते. या सगळ्या परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांना हवा तो योग्य न्याय मिळत नाही व अशा प्रकारे केलेले बदलीचे अर्ज अनेक वर्ष असेच पडून राहतात. त्यामुळे या समस्येला किंवा या गोष्टींना आळा बसावा
आणि सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय मिळावा या हेतूने एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्या विशेष पुढाकाराने बदल्या संदर्भातील संगणकीय प्रणाली द्वारे एप्लीकेशन एसटी महामंडळाकडून विकसित करण्यात येत आहे.
कसे आहे या ॲपचे स्वरुप?
या एप्लीकेशनमध्ये विभागांतर्गत एका आगारातून दुसऱ्या आगारात, प्रदेशांतर्गत एका विभागातून दुसऱ्या विभागात आणि राज्यांतर्गत एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात विनंती बदलीचे अर्ज भरून घेण्यात आले असून संबंधित कर्मचाऱ्याला विनंती बदली मध्ये तीन पर्याय देण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
येणाऱ्या भविष्यकाळामध्ये कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेमध्ये होणारा विविध हस्तक्षेप टाळून या प्रक्रियेत पारदर्शकता यावी याकरिता या संगणकीय एप्लीकेशन चा खूप मोठा फायदा होणार आहे. यामध्ये महामंडळाच्या माध्यमातून विविध जात प्रवर्ग, बिंदू नामावली विचारात घेऊन रिक्त झालेल्या पदांच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या सेवा जेष्ठतेनुसार बदली करण्याची संगणकीय पद्धत महामंडळाच्या माध्यमातून स्वीकारण्यात आलेली आहे
त्यामुळे कर्मचाऱ्यांना बदलीच्या दृष्टिकोनातून सामान्य तर मिळेलच परंतु क्षेत्रनिहाय उपलब्ध मनुष्यबळाचा समान वापर करण्यासाठी देखील या अँप्लिकेशनचा फायदा होणार आहे. लवकरच या संगणकीय प्रणाली द्वारे बदलीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील महामंडळाकडून देण्यात आली आहे.