केंद्र सरकारचा निर्णय ठरेल फायद्याचा! ‘या’ वाहनधारकांना नाही भरावा लागणार टोल टॅक्स; जीएनएसएस प्रणाली ठरेल फायद्याची

महामार्गांवर प्रवास करताना टोल टॅक्स भरणे वाहनधारकांना बंधनकारक असते व तो टोल टॅक्स भरावाच लागतो. परंतु आता केंद्र सरकारने या टोल टॅक्स संदर्भामध्ये काही नवनवीन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा नक्कीच फायदा देशातील कोट्यावधी वाहनधारकांना होणार आहे.

Ajay Patil
Published:
toll tax rule

Toll Tax New Rule:- महामार्गांवर प्रवास करताना टोल टॅक्स भरणे वाहनधारकांना बंधनकारक असते व तो टोल टॅक्स भरावाच लागतो. परंतु आता केंद्र सरकारने या टोल टॅक्स संदर्भामध्ये काही नवनवीन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा नक्कीच फायदा देशातील कोट्यावधी वाहनधारकांना होणार आहे.

इतकेच नाहीतर आता केंद्र सरकारच्या रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून काही नवीन नियमावली तयार करण्यात आली असून ती नक्कीच फायदेशीर ठरणारी आहे.

20 किमीपर्यंत टोल रस्त्याचा वापर करणाऱ्यांना नाही लागणार टोल
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारच्या रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून आता टोल टॅक्स विषयी काही नवीन नियमावली तयार करण्यात आली असून त्यानुसार जर बघितले तर आता 20 किलोमीटर पर्यंत टोलरस्त्यांचा वापर जे वाहनधारक करतात त्यांना आता टोल भरावा लागणार नाही.

याकरिता आता रस्ते परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून एक अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. या अधिसूचनेनुसार बघितले तर आता राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग यांचा वापर करणाऱ्या खाजगी वाहनधारकांना टोल मधून सूट देण्यात आलेली आहे.

परंतु ही सूट महामार्गावर वीस किलोमीटर पर्यंत वाहन चालवणाऱ्यांना मिळणार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे वाहनांवर जीएनएसएस प्रणाली ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे. परंतु जे वाहनधारक वीस किलोमीटर पेक्षा जास्त अंतराचा प्रवास करतील त्यांना मात्र अंतराच्या आधारे टोल भरावा लागणार आहे.

काय आहे नेमकी जीएनएसएस प्रणाली?
जीएनएसएस म्हणजेच ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम हे एक प्रकारचे तंत्रज्ञान असून ते गुगल मॅप्स आणि इतर संचार प्रणाली सारखे मोबाईल नेव्हिगेशन एप्लीकेशनच्या माध्यमातून काम करते. सध्या टोल घेण्यासाठी संपूर्ण देशात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून फास्टटॅग सोबत जीएनएसएस प्रणाली लागू करण्यात आली आहे. तसे पाहायला गेले तर या निर्णयाचा फायदा टोल प्लाझाच्या जवळपास राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. सध्या ही प्रणाली एक पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात येत असून सध्या कर्नाटक आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये लागू करण्यात आलेली आहे.

त्यानंतर आता ही प्रणाली संपूर्ण देशात लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे आता तुम्ही जितके अंतर प्रवास कराल तितकाच टोल तुम्हाला भरावा लागणार आहे व टोल नाक्यावर टोल भरण्याकरिता वाहनांच्या ज्या रांगा लागलेल्या असतात त्या देखील आता लागणार नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe