डॉक्टर म्हणतात, तर केके वाचले असते

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra news : कोलकाता येथे प्रसिद्ध गायक केके यांचा ३१ मे रोजी मृत्यू झाला. एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

नंतर संशय व्यक्त झाल्याने यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे, मात्र काही काळजी घेतली असती तर त्यांचा जीव वाचला असता, असा दावा शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे.

केकेंचे शवविच्छेदन करणाऱ्या एका डॉक्टरांनी सांगितले की, केकेंच्या हृदयात काही ब्लॉकेज होते. त्यांना योग्यवेळी सीपीआर मिळाला असता, तर त्यांचा जीव वाचवता आला असता, केके दीर्घकाळापासून हृदयासंबंधीच्या समस्यांनी ग्रस्त होते. त्यावर उपचार झाले नव्हते.

त्यांच्या डाव्या बाजूला असलेल्या मुख्य धमनीमध्ये मोठा ब्लॉकेज होता. इतर धमन्यांमध्येही लहान लहान ब्लॉकेज होते. लाईव्ह शोमध्ये उत्साहाच्या भरात रक्तप्रवाह थांबला. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तोच त्यांच्या मृत्यूचे कारण ठरला,’ असे डॉक्टरांचे मत आहे.