नगरचे तापमान पुन्हा ४० अंश सेल्सिअसवर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- नगरचे तापमान पुन्हा ४० अंश सेल्सिअसवर गेल्याने वातावरणात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे नगरकर चांगलेच त्रस्त झाले आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी नगर शहराचे तापमान ४५ अंशांवर गेले होते. त्यानंतर मात्र ढगाळ वातावरणामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली होती.

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पारा वाढला आहे. गुरुवारी नगरचे तापमान ४० अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी त्याच काहीशी वाढ झाली होती.

तापमानाचा पारा वाढताच उकाडा ही प्रचंड वाढला आहे. उकाडा वाढला असताना शनिवारी नगर शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नगरकर घामाघूम झाले होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24