Tourist Place: महाराष्ट्रातील सुंदर समुद्रकिनारे,किल्ले आणि अनोखे गणपती मंदिर पहा एकाच जिल्ह्यात! उन्हाळ्याची सुट्टीचा आनंद होईल द्विगुणित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tourist Place: महाराष्ट्राला निसर्गाने अगदी भरभरून दिले असून सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि सातपुडा पर्वत, तसेच कोकणाला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा  म्हटले म्हणजे निसर्गाने महाराष्ट्राला दिलेले देणगी आपल्या लक्षात येते. महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अनेक निसर्ग समृद्ध असलेले अनेक ठिकाणी असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक का होईना पर्यटन स्थळ आहेच.

त्यातल्या त्यात जर आपण महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासारख्या जिल्ह्यांचा विचार केला तर अनेक किल्ले तसेच विस्तीर्ण समुद्रकिनारा यामुळे पर्यटनच्या दृष्टिकोनातून हा परिसर अतिशय समृद्ध आहे. त्यामुळे या परिसरामध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटक देखील भेट देत असतात.

या अनुषंगाने उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे तुमचा देखील या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुठे बाहेर फिरायला जायचा प्लान असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्हा खूप फायद्याचा ठरू शकतो.

या ठिकाणी तुम्हाला फळांचा राजा हापूस आंबा खायला तर मिळेलच परंतु मांसाहारी सेवन करणाऱ्या खवय्यांसाठी ताज्या माशांची मेजवानी देखील तुम्हाला या ठिकाणी मिळेल. शिवाय रत्नागिरीत भेट दिल्यानंतर तुम्हाला अनेक पर्यटन स्थळे देखील पाहता येतील.

 उन्हाळ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील या ठिकाणी भेट द्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची मजा घ्या

1- रत्नदुर्ग किल्ला रत्नदुर्ग किल्ला हा साधारणपणे रत्नागिरी शहरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असून पर्यटकांसाठी हा किल्ला पाहणे एक पर्वणी ठरते. कारण या किल्ल्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहे की या किल्ल्यामध्ये एक भुयारी मार्ग आहे व तो थेट अरबी समुद्रामध्ये बाहेर निघतो.

या किल्ल्याच्या तीनही बाजूने अरबी समुद्र असून आग्नेय दिशेला जमीन तर किल्ल्याच्या पायथ्याशी मिरकर वाडा हे बंदर आहे. घोड्याच्या नाली सारखा या किल्ल्याचा आकार असून या किल्ल्यावरून तुम्हाला सुंदर अशा समुद्राचे दर्शन घेता येते. जवळपास 120 एकर क्षेत्रफळ असलेल्या या किल्ल्याची लांबी तेराशे मीटर आणि रुंदी 1000 मीटर पर्यंत आहे.

एवढेच नाही तर पूर्वेकडून ते पश्चिमेकडे मजबूत तटबंदी देखील आहे व या तटबंदीच्या मध्यभागी प्रवेशद्वार असून तेथील बुरुजावर एक दीपगृह आहे. तसेच या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर शिवकालीन भगवतीचे मंदिर असून या बालेकिल्लाला नव बुरुज आहेत. या किल्ल्याच्या तीन बाजूंना समुद्र आणि एका बाजूला दीपगृह आहे.

2- आरे वारे बीच महाराष्ट्रातील फारच कमी लोकांना हे बीच माहिती आहे. या ठिकाणचा समुद्र किनारा रत्नागिरी ते गणपतीपुळेला जोडला गेला असून कोकणातून रत्नागिरीकडे जेव्हा तुम्ही याल तेव्हा मध्यभागी हा बीच दिसतो. रस्त्याच्या एका बाजूला समुद्रकिनारा आणि दुसऱ्या बाजूला टेकड्या आहेत.

जेव्हा तुम्ही रस्ता ओलांडता तेव्हा तुम्ही या ठिकाणी पोहोचता व त्यालाच आरे वारे व्हिऊ पॉइंट असे देखील म्हणतात. तुम्हाला जर उन्हाळ्याच्या उकाड्यात शांततेत व थंडगार वातावरणात वेळ घालवायचा असेल तर हा बीच तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

3- गणपतीपुळे हे समुद्रकिनाऱ्यावरील गणपती मंदिर असून ते खूप प्रसिद्ध असून या ठिकाणची गणपती मूर्ती स्वयंभू आहे व हे मंदिर जवळपास 400 वर्ष जुने आहे. या ठिकाणच्या समुद्राचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहे की जेव्हा तुम्ही गणपतीपुळ्याला जवळ जाता तसं तसं तुम्हाला समुद्राच्या लाटांचा आवाज यायला सुरुवात होते.

तसेच गणपतीपुळे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक गणपतीच्या मंदिरांमध्ये गणपतीच्या मूर्तीचे तोंड हे पूर्वेकडे असते. मात्र येथील मंदिरामध्ये ते पश्चिम दिशेला आहे. या ठिकाणच्या गणपतीला पश्चिमद्वार देवता म्हणून देखील ओळखले जाते. या गणपतीचे प्रदक्षिणा जवळपास एक ते दीड किलोमीटर इतके असून ही प्रदक्षिणा पूर्ण करणे खूप महत्त्वाचे व भाग्याचे मानले जाते.

4- गुहागर गुहागर हा एक समुद्र बीच असून तो रत्नागिरी पासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. हा अतिशय शांतता असलेल्या समुद्रकिनारा असून तुम्हाला जर अशा शांतता प्रिय ठिकाणी भेट द्यायची असेल तर गुहागर समुद्रकिनारा तुमच्यासाठी पर्वणी ठरू शकतो. तसेच या ठिकाणी तुम्हाला अनेक एडवेंचर्स स्पोर्टचा आनंद घेता येतो.

5- थिबा पॉइंट तुम्हाला जर रत्नागिरीचे खरे निसर्ग सौंदर्य अनुभवायचे असेल तर तुम्ही थिबा पॉईंटला भेट देणे खूप गरजेचे आहे. याठिकाणी तुम्ही रत्नागिरी शहराचा सुंदर नजारा पाहू शकतात. तसेच ठिकाणी असलेले लाईट हाऊस आणि दूधपेश्वर मंदिर फिरण्यासाठी खूप उत्तम असा पर्याय आहे.