Sarkari yojana :- केंद्राने राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. अशा योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येऊन या घटकातील लोकांचे जीवनमान उंचवावे आणि आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून सक्षमता यावी हा या योजनांचा प्रमुख उद्देश आहे.
या योजनांमध्ये व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत करणाऱ्या तसेच आहे त्या व्यवसायांमध्ये वाढ करण्यासाठी आर्थिक दृष्ट्या कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या अनेक योजनांची माहिती आपल्याला यामध्ये घेता येईल.
याचपद्धतीने जर आपण केंद्र सरकारची राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची माहिती घेतली तर हे देखील एक महत्त्वाची योजना असून या माध्यमातून समाजातील दारिद्र्यरेषेखाली जे काही कुटुंब आहेत त्यांना 20 हजार रुपयांची मदत दिली जाते. परंतु ही मदत कोणत्या कुटुंबांना मिळते व त्याकरिता कुठल्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात? याबद्दलची माहिती आपण या लेखात बघू.
काय आहे नेमकी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना?
ही योजना फक्त अशा कुटुंबासाठी राबवण्यात येते की ज्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा काही कारणामुळे मृत्यू झाला आहे. अशा कुटुंबांकरिता खासकरून ही योजना केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून राबवली जाते.
या योजनेच्या माध्यमातून अशा कुटुंबांना 20 हजार रुपयांची मदत केली जाते. या अंतर्गत कुटुंबातील कमावती स्त्री अथवा पुरुषाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास ही मदत मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम असून त्यातील महत्त्वाचा नियम म्हणजे जी व्यक्ती मृत्यू पावते त्याचे वय 18 ते 59 दरम्यान असणे गरजेचे आहे.
या योजनेचा लाभ घ्यायचा तर कुठे कराल अर्ज?
तसे पाहायला गेले तर ही योजना समाजातील सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू होते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबांना ही 20000 रुपयांची रक्कम अर्थसहाय्य म्हणून देण्यात येते.
याकरिता लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पंधरा हजार रुपये व त्यापेक्षा कमी असेल तर योजनेचा लाभ हा मिळतो. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदाराला जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार तसेच तलाठी कार्यालयांमध्ये अर्ज करता येतो.
याकरिता कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूचे वैद्यकीय प्रमाणपत्र व जन्म मृत्यू नोंदणीचा दाखला इत्यादी कागदपत्रे लागतात. त्यामध्ये संबंधित यंत्रणे कडून अर्जाची पडताळणी केली जाते व कुटुंबातील वारसांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येते.