Medicinal Plant Farming: भारतात गेल्या अनेक वर्षांपासून औषधीची पिकांची शेती करण्याचा ट्रेंड खूपच वाढत चालला आहे. याचं कारण म्हणजे औषधी पिकांची शेती कमी खर्चात सुरू करता येते आणि यातून चांगले बक्कळ उत्पन्न (Farmer Income) देखील कमवता येते. अश्वगंधा (Ashwagandha Farming) देखील अशाच एका औषधी वनस्पतीपैकी एक आहे.

याची शेती (Farming) शेतकऱ्यांना चांगलीच फायद्याची ठरत आहे. मित्रांनो माहितीसाठी सांगू इच्छितो की, अश्वगंधाचे वनस्पति नाव विथानिया सोम्निफेरा आहे. भारतात आता अश्वगंधा शेती (Agriculture News) मोठ्या प्रमाणात केली जात आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेश मध्ये याची शेती विशेष उल्लेखनीय आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) देखील याची शेती आता व्यावसायिक स्तरावर करत असल्याचे चित्र आहे.

अशा परिस्थितीत आज आम्ही अश्वगंधा शेती विषयी काही महत्त्वाच्या बाबी घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो जाणकार लोक सांगतात की, अश्वगंधाच्या एक हेक्टर शेती साठी 10 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असतो मात्र यातून शेतकरी बांधवांना एक लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. यामुळे निश्चितच अश्वगंधा शेती शेतकरी बांधवांसाठी अतिरिक्त उत्पन्न कमवण्याचे एक महत्त्वाचे साधन बनत चालले आहे.

या पद्धतीने अश्वगंधाची शेती करा

कृषी क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात की, अश्वगंधा लागवड करण्यासाठी शेतकरी बांधवांनी शेतीची पूर्व मशागत करणे अतिशय आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनी शेतीची व्यवस्थितरीत्या पूर्व मशागत केल्यास अश्वगंधाच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. जाणकार लोकांच्या मते, पावसाळ्यापूर्वी शेताची नांगरणी करून शेतीजमीन चांगली भुसभुशीत केली पाहिजे. शेतातील ओलावा लक्षात घेऊन वाफसा परिस्थितीत फवारणी पद्धतीने पिकाची पेरणी केली जाते.

अश्वगंधाची पेरणी बहुतांश शेतकरी जून-जुलैमध्ये करतात. अश्वगंधा शेतीसाठी प्रति हेक्‍टरी सुमारे 15 किलो नायट्रोजन वापरले जाते, अश्वगंधा पिकात वेळोवेळी तण काढणीचे काम केले जाते. पिकाला वेळोवेळी सिंचनाची देखील गरज भासत असते. योग्य खत आणि पाण्याने सुमारे 5 महिन्यांत पीक पूर्णपणे तयार होते. पीक तयार झाल्यानंतर संपूर्ण रोप मुळासह उपटून टाकले जाते. मुळे पाण्याने धुतल्यानंतर ती झाडांपासून कापून सुकविण्यासाठी उन्हात ठेवली जातात.

एका हेक्टरमध्ये सुमारे 8 क्विंटल मुळ्या मिळतात, जे सुकल्यावर 5 क्विंटलपर्यंत राहतात. त्याच वेळी, झाडापासून सुमारे 60 किलो बियाणे मिळते. सध्या बाजारात अश्वगंधा 40 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जात आहे. शेतकऱ्यांना उत्तम बाजारभाव देणारी ही औषधी शेती आहे. उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, दिल्ली, पंजाब आणि मध्य प्रदेशात याला मोठी मागणी आहे.

निव्वळ नफा एक लाख रुपये आहे

याच्या एक हेक्टर शेतीसाठी सुमारे 10 हजारांपर्यंत खर्च येतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांना एकावेळी उत्पादित केलेल्या पिकातून एक लाखापर्यंतचा निव्वळ नफा मिळतो, त्यामुळे अश्वगंधाची लागवड म्हणजेचं शेतकऱ्यांसाठी लाखोंची कमाई मानली जाते.