अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- खोसपुरी पांढरीपुल परिसरातील डोंगर पायथ्याशी पिपाळ वस्ती येथे असलेल्या बाबीरदेव मंदिरासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सभामंडपसाठी स्वखर्चाने मदत उपलब्ध करुन दिली.

तनपुरे यांचे स्वीय सहाय्यक गोसावी, कार्यकर्ते रघुनाथ झिने, सामाजिक कार्यकर्ते हरीभाऊ हारेर यांनी मदत निधी ग्रामस्थांकडे सुपुर्द केला. यावेळी सरपंच मुबारक पठाण, नामदेव पिसाळ, बंडू पिसाळ, संतोष पिसाळ, बाबुराव भवार, सुनिल भवार, जगन्नाथ पिसाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

पिपाळ वस्ती येथील नागरिकांनी नामदार तनपुरे यांची भेट घेऊन, बाबीर देव मंदिरासाठी सभामंडपाची मागणी केली होती. यावेळी तनपुरे यांनी सभामंडपाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला असून, सध्या तातडीने स्वखर्चाने भरीव मदत निधी त्यांनी ग्रामस्थांना देऊ केला.

सभा मंडपाचे लवकरच काम मार्गी लागणार असून, खोसपुरी येथील ग्रामस्थांच्या वतीने ना. तनपुरे यांचे आभार मानण्यात आले.