अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- मला कोरोनावरील औषध सापडले. रुग्णांच्या मनातील करोनाची भीती दूर करणे, त्यांच्या डोक्यातून, मनातून कोरोना हद्दपार करणे हे करोनावरील प्रभावी औषध असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, नीलेश लंके प्रतिष्ठान व गिरीराज रुग्णालय (बारामती), विघ्नहर्ता रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री पवार यांचा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमातून साजरा व्हावा, मतदारसंघातील गोरगरीब, वंचित घटकांना उपक्रमांचा लाभ मिळावा या भावनेतून मोफत हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार लंके म्हणाले. शिबिरात एकूण ४३५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

त्यापैकी आवश्यकता असणाऱ्या ३२ रुग्णांवर बारामती येथील गिरीराज रुग्णालयात मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर,

हृदयरोग तज्ञ डॉ.रमेश भोईटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे,आत्मा समितीचे अध्यक्ष राहुल झावरे, किसनराव रासकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, डॉ. अमृता वाकचौरे, डॉ. वंदना मोहिते, डॉ.बाळासाहेब कावरे उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर,डॉ.वंदना मोहिते यांची भाषणे झाली. डॉ. बाळासाहेब कावरे यांनी प्रास्ताविक केले.