African Boar Goat Rearing: बोअर जातीच्या शेळीपालनातून हा प्राध्यापक कमवत आहे वर्षाला लाखो रुपये! वाचा शेळीपालनाचे नियोजन

Ajay Patil
Published:
boar goat

African Boar Goat Rearing:- शेतीला असलेल्या जोडधंदाचा विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने पशुपालन व्यवसाय केला जातो व त्यासोबतच शेळीपालन व्यवसाय देखील आता व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर भारतात केला जात आहे. शेळीपालन व्यवसायाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी जागेत करता येणारा व्यवसाय असून मिळणारा नफा देखील इतर व्यवसायांच्या दृष्टिकोनातून खूप जास्त असतो

व त्यामुळेच अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण आता शेळीपालन व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. बरेच व्यक्ती नोकरी धंदा सांभाळून देखील शेळीपालन व्यवसाय यशस्वीरीत्या करत असताना आपल्याला दिसून येतात. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण नांदेड येथील एका प्राध्यापकाचा विचार केला तर त्यांनी नोकरी करत असताना शेळीपालनाचा यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. त्यांचाच या शेळी पालन व्यवसायाची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 प्राध्यापकाचे यशस्वी शेळीपालन

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की नांदेड जिल्ह्यातील रामकिशन नामदेव घोरबांड असे या शिक्षकाचे नाव असून त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी यामध्ये आफ्रिकन बोअर प्रजातीच्या शेळ्यांचे पालन सुरू केले आहे. शेळी पालन व्यवसाय हा प्रामुख्याने मांस उत्पादन व दुधासाठी केला जातो. रामकिशन घोरबांड हे मुळचे लोहा तालुक्यातील कलंबर खुर्द या गावचे रहिवासी आहेत.

सध्या ते ज्युनिअर कॉलेजला प्राध्यापक असून या गावांमध्ये त्यांची पाच एकर शेती आहे व या शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी शेळी पालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. याकरिता त्यांनी youtube वरून शेळी पालन व्यवसाय बद्दल तपशीलवार माहिती मिळवली तसेच काही मित्रांचे मार्गदर्शन घेतले  बंदिस्त प्रकाराचे शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला.

 अशा पद्धतीने शेळीपालनाला केली सुरुवात

शेळी पालन व्यवसाय करण्याचे निश्चित केल्यानंतर 2019 मध्ये साडेतीन लाख रुपये खर्च केला व पंजाबमधून आफ्रिकन प्रजातीच्या 15 शेळ्या आणि एक बोकड खरेदी केला. याकरता त्यांनी शेतामध्ये शेडची उभारणी केली व राधाई गोट फार्म या नावाने शेळी पालन व्यवसाय सुरू केला.

छोट्याशा प्रमाणात त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली आणि आजमीतिला त्यांच्याकडे आफ्रिकन बोअर प्रजातीच्या साठ शेळ्या आहेत. या व्यवसायातून ते एका वर्षाला चार लाखांपर्यंत उत्पन्न आरामात मिळवतात. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये आफ्रिकन बोअर शेळीपालन व्यवसायाचा प्रयोग हा पहिल्यांदाच असल्याचे या परिसरात म्हटले जाते.

अशा पद्धतीने जर अगदी छोट्या प्रमाणामध्ये व्यवस्थित नियोजन करून व्यवसायाला सुरुवात केली तर नक्कीच  खूप चांगल्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते हे रामकिशन घोरबांड यांच्या उदाहरणावरून दिसून येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe