Agri Business Idea: मत्स्यपालनासोबत कराल बदक पालन तर वर्षात व्हाल मालामाल! अशापद्धतीने करा या व्यवसायाची सुरुवात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agri Business Idea:- शेतीसोबत एखादा जोडधंदा असणे हे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे व ही आता काळाची गरज आहे. नैसर्गिक आपत्ती त्यामुळे शेतीचे होणारे नुकसान व त्यामुळे शेतकऱ्यांना बसणारा आर्थिक फटका यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटात असल्याचे चित्र सध्या आपल्याला संपूर्ण देशात दिसून येते.

त्यामुळे शेतीला एखाद्या जोडधंद्याची जोड देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. तसे पाहायला गेले तर शेतकरी पहिल्यापासून पशुपालन हा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून करत आले आहेत. परंतु आता कुकुट पालन तसेच बटर व खेकडा पालनासारखे अनेक व्यवसाय शेतकरी मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत.

एवढेच नाही तर मत्स्यपालन हा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. जर आपण मत्स्यपालनासोबत बदक पालन व्यवसायाचा विचार केला तर हा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर पैसे मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करू शकतो. कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा या व्यवसायातून मिळणे शक्य आहे. त्यामुळे या लेखात आपण या व्यवसायाची माहिती घेऊ.

 मत्स्यपालनासोबत करा बदक पालनाचा व्यवसाय

मत्स्य पालन व बदक पालन हे दोघेही व्यवसाय एकमेकांना पूरक व्यवसाय असून या व्यवसायाची सुरुवात तुम्ही कमी खर्चात करू शकतात. या पद्धतीने जर तुम्ही मत्स्य पालन व्यवसाय सुरू केला तर सुमारे 60 टक्के खर्च तुमचा वाचतो. यामध्ये ज्या तलावात तुम्ही मासे सोडलेले असतात

त्या तलावातील घाण खाण्याचे महत्त्वपूर्ण काम बदक करतात व त्यामुळे पाणी स्वच्छ राहते. एवढेच नाही तर बदक पाण्यात पोहल्यामुळे तलावातील ऑक्सिजनची पातळी देखील वाढते व त्यामुळे माशांची वाढ व उत्पन्न वाढण्यास आपसूक मदत होते.

 कशा पद्धतीने सुरू करावा हा व्यवसाय?

याकरिता तुम्हाला सगळ्यात अगोदर म्हणजे चांगल्या जातीच्या बदकांचे संगोपन करणे गरजेचे आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बदकांच्या प्रजाती आहेत व त्यातील सिल्हेट मेटे, कॅम्पबेल प्रजाती, नागेश्वरी यासारख्या भारतीय प्रजातींची निवड करता येईल.

तसेच अशांकरिता तुम्हाला तलावाची आवश्यकता भासते व अशा तलावाची निवड करणे गरजेचे आहे की त्याचा फायदा किंवा त्याचा उपयोग बदक आणि मासे दोघांना होऊ शकेल. त्यामुळे या व्यवसायाकरिता किमान दीड ते दोन मीटर खोली असलेला तलाव असणे गरजेचे आहे.

या तलावामध्ये प्रतिहेक्टरी 250 ते साडेतीनशे किलो या प्रमाणात चून्याचा वापर करावा. तलावाच्या वरती कोणत्याही काठावर बदकांकरिता कुंपण वाडा तयार करणे गरजेचे आहे. म्हणजेच तलावाला बांबू व लाकडांच्या कुंपण करावे व हा तलाव हवेशीर व सर्व दृष्टीने सुरक्षित असणे गरजेचे आहे. साधारणपणे एका हेक्टर क्षेत्रामध्ये आपण 250 ते 300 बदकांचे पालन करू शकतो.

 माशांसह बदक पालन व्यवसाय चा फायदा कसा होतो?

माशांसोबत बदक पालनाचा व्यवसाय केला तर एका वर्षाला तुम्हाला साडेतीन हजार ते चार हजार किलोग्राम माशांचे उत्पादन मिळते. तसेच 15000 ते 18000 अंडी आणि 500 ते 600 बदकाचे मांस देखील मिळू शकते. बदकांना दररोज 120 ग्राम धान्य खाद्य म्हणून देणे गरजेचे असते.

परंतु मत्स्यपालन सोबत बदक पालन केल्याने तुम्हाला साठ ते सत्तर ग्रॅम धान्य बदकांसाठी पुरेसे ठरते. तसेच मत्स्यपालना सोबतच बदकांचे संगोपन केल्यावर तलावात जास्तीचे खत घालण्याची गरज नसते. तसेच बदक कीटक, वनस्पती व बेडूक खातात जे माशासाठी हानिकारक असतात.

तसेच तलावामध्ये बदक पोहत असल्यामुळे वातावरणातील ऑक्सिजन पाण्यात मिसळण्यास मदत होते. विशेष म्हणजे एक हेक्टर क्षेत्रातील तलावामध्ये तुम्ही 200 ते 300 बदकांचे पालन केले तर त्यांची विष्टा हे माश्यासाठी अन्न म्हणून पुरेसे ठरते.

या प्रकारे तुम्ही मत्स्यपालना सोबत बदक पालन व्यवसाय केला तर नक्कीच कमीत कमी खर्चात चांगला पैसा मिळवू शकतात.