Agri Business Idea: शेतीसोबत सुरू करा हा व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये! वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agri Business Idea :- शेती म्हटले म्हणजे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे बेभरवशाचा व्यवसाय असा एक साधारणपणे शेतीविषयक दृष्टिकोन आहे. परंतु आता हा दृष्टिकोन बदलत असून अनेक प्रकारे शेती उपयुक्त कशी होईल याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर लक्ष देताना दिसून येत आहे. शेतीमध्ये येऊ घातलेले अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आणि आधुनिक पिक पद्धतींचा वापर यामुळे शेती आता परवडण्याजोगी झाली आहे. परंतु तरीदेखील निसर्गाचा विपरीत परिणाम हा शेतीवर होत असतो. कधी अवकाळी पाऊस, होणारी अतिवृष्टी,

वादळी वारे  तसेच गारपिटीमुळे  शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास हा हिरावून नेला जातो व मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकरी बंधूंनी नुसते शेतीवर अवलंबून न राहता शेतीशी संबंधित एखादा छोटा मोठा व्यवसाय करणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून ऐन वेळेस आर्थिक फटका बसला तर या व्यवसायातून आपण आपल्या आर्थिक गरजा तरी पूर्ण करू शकतो. यामुळेच आपण या लेखांमध्ये  अशा एका व्यवसायाची माहिती घेणार आहोत की तुम्ही घरातल्या घरात अगदी कमी खर्चात सुरू करू शकता व चांगल्या प्रकारचा आर्थिक नफा या माध्यमातून मिळवु शकतात.

 आळंबी लागवड देईल तुम्हाला कमी खर्चात चांगला पैसा

आळंबीची लागवड आता जगातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जात असून आळंबीच्या प्रामुख्याने चार जाती या जागतिक स्तरावर उत्पादनामध्ये प्रसिद्ध आहेत. परंतु यामधील जर आपण बटन व शिटाके जातींचा विचार केला तर या थंड तापमानामध्ये चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती असून आपला महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे 20 ते 40°c मध्ये चांगले उत्पादन देणाऱ्या आळंबीच्या जातींची लागवड करणे गरजेचे आहे. तसेच लागवडी करिता जे काही माध्यम लागते हे आळंबीच्या जातीनुसार बदलते.

यामध्ये जर आपण धिंगरी आळंबीचा विचार केला तर ती भाताचा पेंडा तसेच गव्हाचे काड, भुईमुगाची टरफले तसेच केळीची पाने व उसाचे चिपाडे यासारख्या माध्यमांवर देखील वाढते. यामध्ये धिंगरी आळंबी ही लागवडीकरिता खूप उपयुक्त असून तिच्या लागवडीकरिता वापरायचे माध्यम व लागणारे तापमान याचा विचार केला तर ही इतर जातींपेक्षा सरस ठरते. कारण धिंगरी आळंबीला लागवडीसाठी विशिष्ट माध्यम किंवा तापमानाची जास्त गरज भासत नाही. त्यामुळे कमीत कमी भांडवली खर्चामध्ये तुम्ही या जातीच्या आळंबीची लागवड करून शकतात.

या धिंगरी आळंबीचा विचार केला तर तिच्या पस्तीस प्रजाती व्यापारी तत्त्वावरील लागवडीकरिता फायद्याचे आहेत. परंतु यामध्ये  प्ल्यू समिडस, प्ल्यू फ्लोरिडा यासारख्या जाती खूप महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे या जातीचे आळंबीची लागवड करण्याकरिता वापरायची पद्धत अत्यंत साधी आणि सोपी असल्यामुळे सहजपणे शेतकरी बंधूं लागवड करू शकतात.

धिंगरी आळंबीची इतर वैशिष्ट्ये आणि लागवड पद्धत

या जातीच्या अळंबीच्या लागवडीकरिता ऊन तसेच वारा व पाऊस यापासून संरक्षण देऊ शकेल असा निवारा लागतो. याकरता तुम्ही मातीच्या विटा रचून बनवलेली अथवा पक्के बांधकाम असलेल्या खोलीचा किंवा बांबूच्या भिंतींची खोली असेल तरी यामध्ये तुम्ही लागवड करू शकता. भाताचा पेंढा किंवा गव्हाचं काड  यामध्ये या जातीच्या आळंबीचे उत्पादन जास्त येते. त्यामुळे लागवडीकरिता दोघांपैकी एक माध्यम वापरावे.

लागवडीसाठी तुम्ही जो काही पेंढा किंवा काड वापराल तो नवीन हंगामातील व व्यवस्थित सुकलेला असावा. तो जर जुना किंवा रोगट असेल तर आळंबीच्या वाढीवर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते व साहजिकच उत्पादनाला फटका बसतो. तसेच आळंबी लागवडीकरिता दर्जेदार आणि शुद्ध बियाण्याचा वापर करणे गरजेचे आहे.

 अळंबी गृहात अळंबीची लागवड करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या

तुम्हाला ज्या ठिकाणी आळंबीची लागवड करायची आहे त्या ठिकाणी हानिकारक बुरशी किंवा किडी असतील तर त्यांचा नायनाट करणे सगळ्यात प्रथम गरजेचे आहे. याकरिता तुम्ही कार्बन्डेझिम या बुरशीनाशकाची (एक ग्राम प्रति एक लिटर पाणी) आणि मेलोथीऑन( एक मिली प्रति एक लिटर पाणी ) याप्रमाणे फवारणी करावी. तसेच तुम्ही या जातीच्या आळंबी लागवडीकरिता गव्हाचे काड किंवा भाताचा पेंडा वापरणार आहेत त्याचे दोन ते तीन इंच लांबीचे बारीक तुकडे करून घ्यावेत

व एका पोत्यात भरून ते थंड पाण्यात आठ ते दहा तासापर्यंत व्यवस्थित भिजवून घ्यावेत. नंतर ते पोते पाण्याबाहेर काढून त्यामध्ये जे जास्तीचे पाणी असेल त्याचा निचरा करून घ्यावा. गव्हाच्या काडावर किंवा भाताच्या पेंढ्यावर बुरशीची वाढ दिसून येत असेल तर तिचा बंदोबस्त करण्याकरिता निर्जंतुकीकरण करणे देखील आवश्यक आहे.

अशा पद्धतीने तुम्ही तयारी करून अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही याची लागवड करून चांगला पैसा मिळवू शकता.