Agri Business Idea: मस्त गावात शेती करा आणि खत-बियाणे विक्रीचा व्यवसाय सुरू करा! अशा पद्धतीने मिळवा दुकानाचा परवाना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agri Business Idea:- शेती ही निसर्गावर अवलंबून असल्यामुळे निसर्गाचा चांगला किंवा वाईट परिणाम हा शेतीवर होत असतो. जर आपण गेल्या काही वर्षांचा विचार केला तर अतिवृष्टी, अवकाळी पाऊस तसेच गारपीट आणि वादळे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे आपल्याला दिसून आले आहे.

अशा नुकसानीमुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी नुसते शेतीवर अवलंबून न राहता शेतीशी संबंधित काहीतरी व्यवसाय सुरू करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे जर आपण पाहिले तर शेतीच्या संबंधित अनेक प्रकारचे व्यवसाय आपल्याला करता येतात.

पुढे अशा प्रकारच्या व्यवसायांची जोड जर शेतीला मिळाली तर नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू शकतो. या अनुषंगाने जर आपण शेतीशी अगदी जवळचे नाते असलेला कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय हा खूप महत्त्वाचा व्यवसाय असून तुम्ही शेती करत असताना गावांमध्ये कृषी सेवा केंद्र उघडून हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे नफा मिळू शकतो.

परंतु हा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर मात्र याकरिता आवश्यक परवाना मिळवणे अगदी गरजेचे असते. परंतु आता या प्रकारचे परवाने मिळवणे देखील अगदी सहज आणि सोपे झाले असून तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून या व्यवसायाला सुरुवात करू शकतात.

कृषी सेवा केंद्र कसे सुरु करावे व परवाना कसा काढावा?

ज्या शेतकऱ्यांना खत विक्रीचे दुकान सुरू करायचे असेल त्यांनी याकरिता आवश्यक परवाना घेणे आधी गरजेचे आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने खत दुकान परवाना सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येतो. यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून बी बियाणे, रासायनिक खते तसेच कीटकनाशके विक्रीकरिता देखील परवाना दिला जातो. यासाठी अर्ज करताना..
1- इच्छुकांनी aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे व त्याचे अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.
याकरिता किती शुल्क भरावे लागते
यामध्ये नवीन बियाणे परवानाकरिता एक हजार रुपये
नवीन खत परवान्यासाठी 450 रुपये
नवीन कीटकनाशके परवाना करिता 7500 रुपये इतके शुल्क भरणे गरजेचे असते.
हा परवाना किती दिवस वैध असतो?
1- बियाणे परवाना पाच वर्षे वैध असतो व तो रिन्यूअल अर्थात नूतनीकरण करण्याकरिता एक हजार रुपये इतके शुल्क लागते.
2- रासायनिक खते परवान्याकरिता वैधता कालावधी पाच वर्ष आणि नूतनीकरण फी( किरकोळ विक्रेता) 450 आणि घाऊक विक्रेता 2250 रुपये
3- कीटकनाशक परवाना साठी नूतनीकरण करण्याची आवश्यकता नाही.
परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता
याकरिता अर्ज करण्यासाठी अर्जदार हा कृषी पदविका दोन वर्ष( पिक संरक्षण आणि पीक संवर्धन), बीएससी( कृषी), बी टेक, बीएससी( रसायनशास्त्र या विषयासह) यापैकी एक शैक्षणिक अहर्ता धारण करणे गरजेचे राहिल.
ऑफलाइन अर्ज कसा करावा?
ज्या शेतकऱ्यांना ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर ते जवळच्या कॉमन सर्विस सेंटर म्हणजे सीएससी किंवा जिल्ह्यातील जिल्हा कृषी कार्यालयाला भेट देऊन यासाठी अर्ज करू शकतात.