Multibagger Stocks : अनिल अंबानींचा हा शेअर सुसाट; चार वर्षातच केले मालामाल!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Multibagger Stocks : आज आम्ही अशा एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने खूप चांगला परतावा दिला आहे. मागील काही दिवसांपासून अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना फक्त चार वर्षातच श्रीमंत केले आहे.

शुक्रवार, 22 मार्च रोजी रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 5 टक्के पेक्षा जास्त वाढून 286.70 रुपयांवर पोहोचले आहेत. शुक्रवारी कंपनीच्या शेअरने 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे. गेल्या एका महिन्यात रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स सुमारे 22 टक्क्यांनी वाढले आहेत.

गेल्या 4 वर्षात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीच्या शेअर्समध्ये 4 वर्षात जवळपास 3000 टक्के वाढ झाली आहे. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 9.20 रुपयांवर होते.

22 मार्च 2024 रोजी कंपनीच्या शेअर्सनी 286.70 रुपयांचा उच्चांक गाठला. जर एखाद्या व्यक्तीने 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि त्याची गुंतवणूक त्याने कायम ठेवली असेल, तर या शेअर्सचे सध्याचे मूल्य 31.16 लाख रुपये झाले असते.

गेल्या एका वर्षात रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 90 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. 23 मार्च 2023 रोजी रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 148.10 रुपयांवर होते. 22 मार्च 2024 रोजी कंपनीच्या शेअर्सनी 286.70 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. त्याचवेळी, गेल्या 6 महिन्यांत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

गेल्या 3 वर्षात कंपनीचे शेअर्स 670 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 36.55 रुपयांवरून 286.70 रुपयांपर्यंत वाढले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्सनी 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 131.40 रुपये आहे.