Apple Watch Series: अँपलने लॉन्च केली वैशिष्ट्यपूर्ण वॉच सिरीज! ओळखता येणार या वॉचमध्ये बोटांच्या हालचाली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Apple Watch Series:- जागतिक स्तरावरील प्रसिद्ध कंपनी असलेल्या एप्पलने आयफोन 15 ही आयफोनची सिरीज लॉन्च केली असून याचा इव्हेंट रात्री पार पडला. यामध्ये ॲपलने आयफोन 15 प्रो, आयफोन पंधरा प्रो प्लस, आयफोन 15 आणि आयफोन 15 प्रो मॅक्स या चार उत्पादनाचे लॉन्चिंग केले असून या फोनमध्ये अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत.

कंपनीने प्रथमच टाईप सी पोर्टसह कोणतेही आयफोन सादर केले असून एप्पल चा हा कार्यक्रम कॅलिफोर्नियातील क्यूपर्टीनो येथील कंपनीच्या मुख्यालयामध्ये पार पडला. या इव्हेंटमध्ये कंपनीने एप्पल वॉच सिरीज 9 देखील सादर केली आहे. कंपनीचे सीईओ टीम कुक यांच्या हस्ते एप्पल वॉच सिरीज नऊ लॉन्च करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वॉच सिरीज मध्ये  S9 चिप्स देण्यात आला असून तो आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली असा चिपसेट आहे. ही घड्याळे नवीन रिडीझाईन केलेले आहेत.

 काय आहेत या अँपल वॉच सिरीज 9 ची वैशिष्ट्ये?

या वॉच सिरीजमध्ये डबल टॅप फीचर देण्यात आले असून याच्या मदतीने तुम्ही कॉल प्राप्त करू शकणार आहात. एप्पलच्या या वॉच सिरीज  बोट हलवून नियंत्रित केली जाऊ शकणार आहे. एप्पलने या एप्पल वॉचकरिता नाइकी या कंपनीसोबत भागीदारी केली असून 100% रिसायकल सामग्री वापरण्यात आली आहे. तसेच मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील एप्पल कडून एप्पल वॉच अल्ट्रा सादर करण्यात आला आहे.

या एप्पल वॉच अल्ट्राचा सर्वोच्च ब्राईटनेस 3000 nits आहे. म्हणजेच तुम्ही प्रखर सूर्यप्रकाशात देखील स्क्रीन आरामात पाहू शकणार आहात. तसेच यामध्ये डबल टॅप वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे. जर आपण या वॉचची बॅटरी लाइफ पहिली तर तिला 36 तासांचा बॅकअप देण्यात आल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

पावर सेविंग मोडमध्ये बॅटरी 72 तास चालते. एवढेच नाही तर एप्पलने एप्पल वॉच SE देखील लाँच केले आहे. साधारणपणे 22 सप्टेंबर पासून सर्व घड्याळांची विक्री सुरू होणार असून आजपासून प्री बुकिंग देखील सुरू करण्यात आले आहे.

 किती असणार आहे या घड्याळाची किंमत?

एप्पल वॉच अल्ट्राची सुरुवातीची किंमत ही डॉलरमध्ये पाहिली तर $799 डॉलर आहे म्हणजेच 66 हजार 212 रुपये भारतीय चलनात याची किंमत असणार आहे. तर एप्पल वॉच सिरीज नऊची सुरुवातीची किंमत डॉलर मध्ये $399 इतके असणार आहे व भारतीय चलनामध्ये अंदाजे तीस हजार 64 रुपये असणार आहे.