Atal Pension Yojana : दरमहा 210 रुपये गुंतवून मिळवा ‘इतक्या’ हजारांची पेन्शन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Atal Pension Yojana : सुरक्षित भविष्यासाठी आतापसूनच गुंतवणूक करणे फार महत्वाचे असते. अशातच सरकारद्वारे देखील उत्तम योजना राबवल्या जातात. जिथे गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. अशीच एक सरकराची खास योजना म्हणजे अटल पेन्शन योजना, या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही खात्रीशीर परतावा मिळवू शकता.

सरकारद्वारे चालवली जाणारी ही एक पेन्शन योजना आहे. जी छोटी बचत योजना आहे. या योजनेंतर्गत तुम्ही थोडीशी गुंतवणूक करून खात्रीशीर पेन्शन मिळवू शकता. दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी, तुम्हाला तुमच्या कमाईतून दरमहा या योजनेत फक्त 210 रुपये गुंतवावे लागतील. कमी गुंतवणुकीत अधिक पेन्शन लक्षात घेऊन सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली होती. सरकारने 2015-16 मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली होती.

तुम्ही तुमच्या गरजेनुसार दरमहा थोडी रक्कम जमा करून तुम्ही वृद्धापकाळात 1000 ते 5000 रुपयांपर्यंतची मासिक पेन्शन मिळवू शकता. यामध्ये गुंतवणूक करण्याची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांची संख्या पाच कोटींच्या पुढे गेली आहे. यावरून लक्षात आले असेल, ही योजना किती लोकप्रिय आहे.

या योजनेत तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी पासून गुंतवणूक सुरु करू शकता. येथे दरमहा 210 रुपये जमा केल्यास, वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळेल. 1000 रुपयांच्या पेन्शनसाठी तुम्हाला 42 रुपये, 2000 रुपयांसाठी 84 रुपये, 3000 रुपयांसाठी 126 रुपये आणि 4000 रुपयांच्या पेन्शनसाठी 168 रुपये दरमहा जमा करावे लागतील. या योजनेत जितक्या लवकर गुंतवणूक सुरू होईल तितका फायदा होईल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही यामध्ये गुंतवणुकीची रक्कम देखील वाढवू किंवा कमी करू शकता.

ही योजना 18 ते 40 वयोगटातील सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. कोणताही नागरिक जो 01 ऑक्टोबर 2022 पासून करदाता आहे किंवा आहे तो APY मध्ये सामील होण्यास पात्र नाही. म्हणजेच तो या योजनेत गुंतवणूक करू शकत नाही. अटल पेन्शन योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला 1000 ते 5000 रुपये मिळतात. गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास, पेन्शनचे पैसे नॉमिनीला मिळतील.