Credit Card Tips:- सध्या विविध आर्थिक गरजा भागवण्यासाठी पर्सनल लोन तसेच घर खरेदीसाठी होमलोन व कारलोन सारख्या कर्ज घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यासोबतच क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे.
तसे पाहायला गेलते तर आर्थिक गरजेच्या वेळी क्रेडिट कार्डचा वापर हा अनेक कारणांनी फायद्याचा आहे. परंतु क्रेडिट कार्ड वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. कारण क्रेडिट कार्ड तुम्ही कशा पद्धतीने वापरत आहात? याचा थेट परिणाम हा तुमच्या सिबिल स्कोर वर होत असतो.
त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काही गोष्टी समजून घेणे देखील तितकेच गरजेचे असते.क्रेडिट कार्ड पेमेंट करिता केवळ अतिरिक्त वेळ मिळत नाही तर तुम्ही रिवार्ड पॉईंटच्या माध्यमातून पैसे देखील कमवू शकतात.
तसेच क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अनेक ई-कॉमर्स वेबसाईटवर अनेक ऑफर्स उपलब्ध असतात व त्यामुळे तुम्ही असे फायदे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळवू शकतात. परंतु याच क्रेडिट कार्डशी काही वैशिष्ट्ये ग्राहकाला कर्जाच्या जाळ्यात देखील अडकवू शकतात. त्याबद्दलचीच माहिती या लेखात घेऊ.
क्रेडिट कार्ड वापरा परंतु या गोष्टींची काळजी घ्या
1- एटीएम मधून पैसे काढणे– बरेच जण एटीएम मधून पैसे काढण्यासाठी देखील क्रेडिट कार्डचा वापर करतात. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर एटीएम मधून चुकूनही पैसे काढू नका. कारण जर तुम्ही अशा पद्धतीने पैसे काढले तर अशा काढलेल्या रकमेवर खूप मोठ्या प्रमाणावर व्याज द्यावे लागते.
जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून काही वस्तू खरेदी केल्या व त्याची बिले भरली तर तुम्हाला ते पेमेंट करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मिळतो. परंतु या उलट तुम्ही एटीएम मधून पैसे काढले तर इतका कालावधी तुम्हाला मिळत नाही. म्हणजे एटीएम मधून काढलेले पैसे परत करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा वेळ नाही. तेव्हा तुम्ही केटीएम मधून क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे काढतात त्या दिवसापासून व्याज जमा होऊ लागते.
2- एका क्रेडिट कार्डचा वापर दुसऱ्या कार्डचे बिल भरण्यासाठी करणे– बरेच जण एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरतात. त्यामुळे अनेक व्यक्ती बॅलन्स ट्रान्सफर म्हणजेच एका क्रेडिट कार्डचा वापर करून दुसऱ्या कार्डचे बिल भरतात. जर तुम्ही असे करत असाल तर तुम्हाला यामध्ये शिल्लक हस्तांतरण करण्यासाठी शुल्क भरावे लागते.
दुसऱ्या कार्डचे बिल भरण्यासाठी तुम्ही एका क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुमचा सिबिल स्कोर देखील खराब होऊ शकतो. मोठी आर्थिक गरज असेल तेव्हा शिल्लक हस्तांतरण वैशिष्ट्ये वापरणे फायद्याचे ठरू शकते. परंतु तुम्ही जर वारंवार असे करत असाल तर यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.