Axis Bank : अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी खास सुविधा सुरु केली आहे. देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील कर्ज देणाऱ्या अॅक्सिस बँकेने आता डिजिटल बँकिंगच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. बँकेने आपल्या डिजिटल जागरूक ग्राहकांसाठी ‘इन्फिनिटी सेव्हिंग अकाउंट’ सुरू करण्याची घोषणा केली आहे.
बँकेने लॉन्च केलेले ‘इन्फिनिटी सेव्हिंग अकाउंट’ हे सबस्क्रिप्शन मॉडेलवर आधारित आहे. म्हणजेच, यासाठी बँक तुमच्याकडून मासिक आणि वार्षिक आधारावर काही रुपये आकारेल. त्या बदल्यात बँक तुम्हाला अनेक सुविधा देईल. तसेच हे बचत खाते अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना विशेषाधिकार देखील प्रदान करेल. चला जाणून घेऊया या डिजिटल बचत खात्याच्या फायद्यांबद्दल…
काय आहे सबस्क्रिप्शन मॉडेल?
बँकेचे ग्राहक लॉन्च झालेल्या या नवीन बचत खात्यामध्ये व्हिडिओ केवायसीद्वारे डिजिटल खाते उघडू शकतात. यासाठी, बँक 2 सबस्क्रिप्शन मॉडेल ऑफर करते, एक मासिक आणि दुसरे वार्षिक आहे. मासिक सबस्क्रिप्शनमध्ये बँक तुमच्याकडून 30 दिवसांसाठी जीएसटीसह 150 रुपये आकारेल तर वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये बँक तुमच्याकडून 360 दिवसांसाठी 1,650 रुपये आकारेल.
बचत खात्याचे फायदे :-
अॅक्सिस बँकेद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या या डिजिटल बचत खात्यामध्ये तुम्हाला कोणतीही किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. तसेच, तुम्हाला देशांतर्गत व्यवहारांवर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. त्याच वेळी, डेबिट कार्ड व्यतिरिक्त, तुम्ही अमर्यादित एटीएम व्यवहार विनामूल्य करू शकता. दुसरीकडे, चेकबुक वापरण्यासाठी आणि मर्यादेपेक्षा जास्त रोख व्यवहार करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
‘इन्फिनिटी सेव्हिंग अकाउंट’ची वैशिष्ट्ये :-
-किमान शिल्लक आवश्यक नाही.
-कोणत्याही देशांतर्गत व्यवहार शुल्कावर आकारले जाणार नाही.
-मोफत डेबिट कार्ड आणि अमर्यादित एटीएम पैसे काढण्याची सुविधा.
-चेकबुकच्या वापरावर किंवा मर्यादेपेक्षा जास्तीचे व्यवहार / पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.