Axis Bank Personal Loan: ॲक्सिस बँक देईल तुम्हाला कमीत कमी कागदपत्रात व ताबडतोब 50 हजार ते 40 लाखापर्यंत पर्सनल लोन! वाचा माहिती

Ajay Patil
Published:
axis bank personal loan

Axis Bank Personal Loan:- व्यक्तीला जीवनामध्ये अनेक गोष्टींसाठी पैसे लागत असतात. बरेचदा आपल्याला घराचे नूतनीकरण करण्यासाठी किंवा कुटुंबाने एखादी सहल आयोजित केली तेव्हा, कुटुंबामध्ये लग्न समारंभ, आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती उद्भवल्यास आपल्याला अचानकपणे पैशांची गरज भासते.

त्यामुळे व्यक्ती बऱ्याचदा बँकांकडे कर्ज मागणी करतो. यामध्ये बऱ्याचदा व्यक्ती वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन घेतो. प्रत्येक बँकांचे पर्सनल लोन संबंधीच्या अटी व पात्रता यादेखील वेगवेगळ्या असतात. तसे पाहायला गेले तर संपूर्ण बँक पर्सनल लोनची सुविधा पुरवतात.

परंतु या सर्व बँकांमध्ये जर आपण ॲक्सिस बँकेचा विचार केला तर ही बँक कमीत कमी कागदपत्रांमध्ये व ताबडतोब मंजुरीसह तुम्हाला 50 हजार ते 40 लाखापर्यंत पर्सनल लोन देऊ शकते. तसेच तुमचे जास्त व्याजदर असलेले पर्सनल लोन असेल तर तुम्ही ॲक्सिस बँकेकडे ते ट्रान्सफर देखील करू शकतात. याच अनुषंगाने आपण ॲक्सिस बँक पर्सनल लोनविषयी काही महत्त्वाची माहिती घेऊ.

 ॲक्सिस बँक पर्सनल लोनची वैशिष्ट्ये

तुम्हाला देखील ॲक्सिस बँकेकडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुमचे वय कमीत कमी 21 वर्षे असणे गरजेचे आहे. याशिवाय तुमच्याकडे आयडी तसेच उत्पन्न आणि रहिवासी पुरावा इत्यादीसारखे महत्त्वाचे कागदपत्र असणे गरजेचे आहे. ॲक्सिस बँकेकडून पर्सनल लोन घेतल्यानंतर त्याचा ताबडतोब भरणा करण्याचा भार कमी करण्याकरिता तुम्ही समान मासिक हप्ता अर्थात ईएमआय या सुविधेचा पर्याय निवडू शकता.

या पर्सनल लोनचा परतफेडीचा कालावधी 12 ते 60 महिन्याच्या दरम्यान असण्याची शक्यता असते. जर तुम्ही बँकेचे विद्यमान ग्राहक असाल तर तुम्ही पर्सनल लोन करिता परवडणाऱ्या आणि उत्तम अशा व्याजदराचा लाभ मिळवू शकतात.तसेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती पैसे द्यावे लागतील हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल तर तुम्ही पर्सनल लोन कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता व त्या आधारित तुम्ही तुमचा कर्ज परतफेडीचा कालावधी निवडू शकतात व या निवडलेल्या कालावधी करिता तुम्ही प्रत्येक महिन्याला तुम्हाला सोयीस्कर पडेल अशी रक्कम निवडू शकतात.

 पर्सनल लोनसाठी अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा

1- सगळ्यात अगोदर म्हणजे तुमचे जे बँकेमध्ये खाते आहे. जसे की पगार खाते, गृह कर्ज, कार लोन इत्यादी बाबतीत तुमच्या ज्या बँकेचे संबंध आहेत त्या बँकेचा वापर पर्सनल लोन

साठी करणे गरजेचे आहे.कारण केवायसीची प्रक्रिया या माध्यमातून सुलभ होते.

2- तसेच याकरताचे व्याजदर, लागणारे प्रक्रिया शुल्क, प्री पेमेंट / फोर क्लोजरसाठी दंड इत्यादी बाबतीत इतर बँकांशी तुलना करणे गरजेचे असते. कारण हे सर्व शुल्क तुमच्या खर्चामध्ये जोडले जाते. यामध्ये एखादी कमी व्याज दारात लोन देणारी बँक जास्त प्रक्रिया शुल्क किंवा फोर क्लोजरसाठी दंड आकारू शकते. परंतु ॲक्सिस बँक पर्सनल लोनकरिता प्री पेमेंट किंवा फोरक्लोजरसाठी कोणतेही शुल्क आकारत नाही.

3- तसेच महत्त्वाचे म्हणजे क्रेडिट स्कोर चांगला ठेवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या कर्जाच्या विनंतीला पटकन मंजुरी मिळू शकते. हे काही पात्रतेचे निकष असतात परंतु कर्जाच्या अर्जाचे व्हेरिफिकेशन करताना बँक इतर अटीसोबत या बाबींचे मूल्यमापन करते.

 ॲक्सिस बँक पर्सनल लोनसाठी अर्ज कसा कराल?

1- तुम्हाला ज्या प्रकारे सध्या कर्जाची गरज आहे व त्याकरता किती रक्कम लागणार आहे हे अगोदर जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

2- सध्या तुमचे एखादी विद्यमान कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे हप्ते सुरू असतील तर या बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण हे तुम्ही भरू शकणार ईएमआय निर्धारित करतात. तुम्ही एका महिन्यामध्ये किती परतफेड करू शकता हे तुम्हाला समजायचे असेल तर वैयक्तिक कर्ज पात्रता कॅल्क्युलेटरचा वापर करावा.

3- तसेच तुमचे मिळणारे उत्पन्न आणि तुम्ही काम करत असलेली कंपनीसह रोजगार इत्यादी गोष्टी पात्र असतील की नाही हे जाणून घेण्यासाठी बँकेच्या पात्रता अटी अगोदर तपासा.

4- बँकेने दिलेला व्याजदर तपासावा तसेच तुमचा महिन्याचा खर्च काय असेल हे जाणून घेण्यासाठी पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर चा वापर करावा.

5- तुम्ही विद्यमान ग्राहक असाल तर बँकेच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर किंवा इंटरनेट बँकिंग खात्याच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज करू शकतात. तुम्ही नवीन ग्राहक असल्यास तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर अर्ज डाऊनलोड करू शकता किंवा शाखेत मिळवू शकतात.

6- केवायसी साठी लागणारी कागदपत्रे तसेच पत्त्याचा पुरावा आणि उत्पन्नाचा पुरावा अर्जासोबत प्रक्रिया शुल्काचा धनादेश द्यावा.

7- त्यानंतर बँक कागदपत्रांची पडताळणी करते व कर्ज मंजूर करेल आणि तुमच्या पात्रतेवर आधारित रक्कम मंजूर करेल. त्यानंतर आवश्यक करारावर स्वाक्षरी केली जाईल आणि स्थायी सूचना विनंती / ईसीएस फॉर्म इत्यादी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कर्जाचे पैसे तुमच्या खात्यात वितरित केले जातात.

8- या प्रक्रियेनंतर संबंधित कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते व या प्रक्रियेस 30 दिवसांचा कालावधी लागू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe