Bank Loan: ‘या’ सरकारी बँक देतात ज्येष्ठ नागरिकांना कर्ज! मिळते 25 हजारापासून ते 10 लाख रुपयापर्यंत लोन, वाचा माहिती

ज्येष्ठ नागरिकांना कर्ज देणाऱ्या बँक जर बघितल्या तर यामध्ये देशातील सर्वात मोठी असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्यानंतर पंजाब नॅशनल बँक या दोन्ही बँक वयाच्या साठ वर्षानंतर ज्येष्ठ नागरिकांना कर्ज देतात.

Published on -

Bank Loan:- आर्थिक गरजेच्या वेळी जेव्हा आपण बँकेमध्ये विविध प्रकारचे कर्ज घ्यायला जातो तेव्हा कर्ज देण्याच्या अगोदर बँक अनेक प्रकारच्या गोष्टी तपासात असते. यामध्ये सगळ्यात अगोदर कर्जदाराचे वय आणि त्याचे उत्पन्न किती आहे हे लक्षात घेऊनच बँक कर्ज देत असते.

तसेच अशा प्रकारे कर्ज घेताना बँकेचे काही नियम आणि अटी असतात व त्या पूर्ण करणे किंवा पाळणे देखील तितकेच गरजेचे असते. परंतु यामध्ये वय आणि संबंधित कर्जदाराचे उत्पन्न या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे अनेक बँक ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच वृद्ध लोकांना कर्ज देत नाहीत.

कारण अशा लोकांकडे कोणत्याही प्रकारचे निश्चित उत्पन्नाचे स्त्रोत नसतात. परंतु याला काही सरकारी बँक अपवाद आहेत व अशा बँक जेष्ठ नागरिकांना कर्ज देतात व त्यांच्याकरिता विशेष योजना देखील चालवतात.

अशाप्रकारे ज्येष्ठ नागरिकांना कर्ज देणाऱ्या बँक जर बघितल्या तर यामध्ये देशातील सर्वात मोठी असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्यानंतर पंजाब नॅशनल बँक या दोन्ही बँक वयाच्या साठ वर्षानंतर ज्येष्ठ नागरिकांना कर्ज देतात.

 काय आहे पंजाब नॅशनल बँकेची पीएनबी कर्ज योजना?

पंजाब नॅशनल बँकने ज्येष्ठ नागरिकांसाठी खास करून पेन्शनधारकांसाठी वैयक्तिक कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी पेन्शनची जी काही रक्कम असेल त्यानुसार वैयक्तिक कर्ज दिले जाते.

यामध्ये पंजाब नॅशनल बँक 70 वर्षापर्यंतच्या व्यक्तींना कर्ज देते व या योजनेअंतर्गत 25 हजारापासून ते दहा लाख रुपये किंवा मिळणाऱ्या पेन्शन रकमेच्या 18 पट कर्ज देते. संरक्षण क्षेत्रातील जे निवृत्तीवेतनधारक असतील अशा नागरिकांना पेन्शन रकमेच्या वीस पट कर्ज मिळते.

अशाप्रकारे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय 70 वर्षापेक्षा जास्त असल्यास पेन्शनधारकांना पाच वर्षाच्या आत म्हणजे 60 हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड करावी लागते. तसेच 75 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कर्ज धारकाला 24 हप्त्यांमध्ये म्हणजेच दोन वर्षात कर्जाची परतफेड करावी लागते.

 एसबीआय कर्ज योजना

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन कर्ज योजना सुरू केली असून या योजनेत देखील वृद्धांना पेन्शन रकमेच्या आधारे कर्ज दिले जाते व या योजनेत तुम्हाला मिळणाऱ्या पेन्शननुसार कर्जाची रक्कम ठरवली जाते.

स्टेट बँक ऑफ इंडिया हे कर्ज फक्त अशा व्यक्तींना देते ज्यांचे पेन्शन पेमेंट ऑर्डर स्टेट बँक ऑफ इंडियाकडे आहे. कर्जासाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय 76 वर्षापेक्षा कमी असावे.

स्टेट बँकेकडून घेतलेल्या या कर्जाची परतफेड 72 महिन्यात करावी लागते. एसबीआयच्या पेन्शन कर्ज योजनेच्या संबंधित अधिक माहिती करिता तुम्हाला बँकेचे अधिकृत वेबसाईट  https://sbi.co.in/ किंवा बँकेचा टोल फ्री क्रमांक 1800-11-2211 वर संपर्क साधावा लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!