BOB UPI ATM update : बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरु केली, ज्याद्वारे ग्राहकांना पैसे काढणे अगदी सोपे होईल, मागील काही काळापासून UPI ने डिजिटल पेमेंटमध्ये सर्वात मोठे योगदान दिले आहे. याचा वापर करून तुम्ही एकमेकांना सहज पैसे ट्रान्सफर करू शकता. दरम्यान आता सुविधेत एक मोठे अपडेट देखील आले आहे जे ग्राहकांना UPI वापरून एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची परवानगी देते.
अशा परिस्थितीत तुमच्याकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसले तरीही तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा मिळते. अलीकडेच, हिताची पेमेंट सर्व्हिसने NPCI च्या सहकार्याने UPI ATM लाँच केले, ज्यानंतर आता बँक ऑफ बडोदा ग्राहकांना UPI वापरून डेबिट किंवा क्रेडिट कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा देत आहे.
UPI ATM सेवेचा लाभ भारतीय सरकारी बँक, बँक ऑफ बडोदा (BOB) द्वारे प्रदान केला जात आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून UPI QR कोड स्कॅन करून बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधून सहज पैसे काढू शकता.
बँक ऑफ बडोदाने सार्वजनिक ठिकाणी UPI एटीएम सुरू केले आहेत. तुमच्याकडे डेबिट कार्ड नसेल तर तुम्ही UPI ॲप वापरून पैसे काढू शकता. UPI QR कोड स्कॅन करून बँक ऑफ बडोदाच्या UPI ATM मधून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध असेल.
बँक ऑफ बडोदाने एका निवेदनात म्हटले आहे की, UPI एटीएम सुरू करणारी ही देशातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. तुमच्या माहितीसाठी, गेल्या आठवड्यात हिताची पेमेंट सर्व्हिसेसने ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये UPI ATM सेवा सुरू केली होती.
इतर बँकांचे ग्राहकही पैसे काढू शकतील?
बँकेने UPI ATM साठी इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल (ICCW) तंत्रज्ञान वापरले आहे. या तंत्रात पैसे काढण्यासाठी कार्डची गरज नाही. बँकेचे म्हणणे आहे की तिचे आणि इतर बँक ग्राहक UPI-सक्षम मोबाइल ॲपद्वारे बँक ऑफ बडोदा UPI ATM मधून पैसे काढू शकतील.
बँक ऑफ बडोदाच्या UPI ATM मधून पैसे कसे काढायचे?
-बँक ऑफ बडोदाच्या UPI ATM वर जा.
-त्याच्या स्क्रीनवर “UPI कार्डलेस कॅश” पर्याय उपलब्ध असेल, त्यावर क्लिक करा.
-यानंतर रोख पैसे काढण्याचा पर्याय असेल, तो निवडा.
-आता स्क्रीनवर QR कोड दिसेल, तुमच्या फोनमध्ये UPI ॲप उघडा आणि तो स्कॅन करा.
-यानंतर तुम्हाला ज्या बँक खात्यातून पैसे काढायचे आहेत ते निवडा.
-यानंतर पिन टाका आणि त्यानंतर व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण होईल.
-व्यवहार पूर्ण झाल्यानंतर एटीएममधून रोख रक्कम येईल.
एका वेळो किती पैसे काढू शकता ?
बँक ऑफ बडोदाच्या UPI ATM मधून तुम्ही फक्त एकदाच 10,000 रुपये काढू शकता. यासाठी देखील, आधीच अस्तित्वात असलेला UPI दैनिक मर्यादा नियम लागू राहील.