सध्या बँकेशी प्रत्येकाचा संबंध येतो. प्रत्येकाचे बँकेमध्ये खाते असते.आपण बँकेतील खात्याचा प्रकार पाहिला तर ते प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. यामध्ये जर पहिला प्रकार पाहिला तर तो असतो शून्य शिल्लक बचत खाते आणि दुसरे म्हणजे किमान शिल्लक बचत खाते हे होय.
यामध्ये जर आपण पहिल्या प्रकाराचा म्हणजेच शून्य शिल्लक बचत खात्याचा विचार केला तर या खात्यामध्ये कोणतीही कमीत कमी रक्कम ठेवण्याची तुम्हाला मर्यादा नसते आणि दुसरा प्रकार म्हणजे किमान शिल्लक बचत खात्याचा विचार केला तर यामध्ये तुम्हाला एक ठराविक रकमेपेक्षा कमी शिल्लक ठेवता येत नाही.
यातील पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे शून्य शिल्लक खाते याचा अर्थ असा होतो की या खात्यात तुम्ही बॅलन्स ठेवला अथवा न ठेवला तरी बँकेकडून कुठलेही चार्ज आकारले जात नाही किंवा त्याचा तसा काही फरक पडत नाही. परंतु बऱ्याचदा शून्य शिल्लक खाते असताना देखील ग्राहकांच्या खात्यातून पैसे कट होतात. तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की बँक असे पैसे का कापते? या अनुषंगाने आपण या लेखात माहिती घेणार असून शून्य शिल्लक खात्यावर बँक कोणकोणत्या कारणांमुळे पैसे कापते.
शून्य शिल्लक खात्यावरच्या कोणकोणते शुल्क आकारतात?
1- बँक सर्विस चार्ज कापते– ज्याही बँकेमध्ये आपले खाते असते त्या सर्व बँका आपले खाते मेंटेन करण्यासाठी काही शुल्क आकारतात व हे शुल्क सर्व प्रकारच्या खात्यांना लागू होते. त्यामुळे तुमचे खाते शून्य शून्य खाते असले तरी त्यातून काही वेळा पैसे कट होतात.
2- डेबिट कार्ड शुल्क– जेव्हा आपण बँकेमध्ये खाते उघडतो तेव्हा आपल्याला एक कीट मिळते व त्यासोबत आपल्याला डेबिट कार्ड बँकेकडून दिले जाते. परंतु बँकेकडून दिले जाणारे हे डेबिट कार्ड देखील मोफत नसते. याकरिता संबंधित बँका वार्षिक आधारावर बँक ग्राहकांकडून शुल्क आकारतात.
3- एटीएम शुल्क– आपण बऱ्याचदा पैसे काढण्यासाठी एटीएम चा वापर करतो व अशा वेळेस बऱ्याचदा दुसऱ्या बँकेचे एटीएम चा वापर करतो. जर तुम्ही दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरत असाल तर त्याकरिता देखील तुम्हाला शुल्क द्यावे लागते. तुम्ही जर तुमच्या बँकेच्या एटीएम मधून जरी पैसे काढत असाल तरी तुम्हाला फक्त महिन्यात चार वेळा फ्री मध्ये पैसे काढता येतात व त्यानंतरच्या ट्रांजेक्शन साठी तुम्हाला बँकेकडून शुल्क आकारले जाते.
4- अपुरा बॅलन्स– ज्या खात्यामध्ये कमीत कमी शिल्लक ठेवणे आवश्यक असते व त्या मर्यादेपेक्षा जर खात्यात कमी पैसे असेल तर बँक शुल्क आकारते.
5- ट्रान्सफर चार्ज– बऱ्याचदा आपण पैसे ट्रान्सफर करण्यासाठी यूपीआय तसेच आरटीजीएस, एनईएफटी सारख्या मोडचा वापर करतो व याच्या माध्यमातून दुसऱ्याच्या खात्यात पैसे पाठवतो. परंतु या सुविधा देखील बँकेकडून फ्री दिल्या जात नाही. यावर देखील बँकेकडून शुल्क आकारले जाते.
6- अकाउंट बंद करण्यासाठीचे शुल्क– जर तुम्ही तुमचे बँक खाते बंद केले तर बँक तुमच्याकडून त्याकरिता देखील शुल्क आकारू शकते.
7- सुप्तता शुल्क– जर तुमच्या खात्यातून तुम्ही बराच काळ कोणताही व्यवहार केला नाही तर बँक ते खातं निष्क्रिय करतात. साधारणपणे याची मुदत एक वर्षापर्यंतची असते.
अशा अनेक कारणांमुळे तुमचे खाते शून्य शिल्लक खाते असताना देखील त्या खात्यातून पैसे कापले जातात.