Bank Rule: एटीएम मधून तुम्हाला बनावट नोट मिळाली तर बँक देईल तुम्हाला पैसे परत! परंतु करावे लागेल ‘हे’ काम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Rule:- सध्या डिजिटललायझेशनचे युग असून बँकेच्या देखील बऱ्याच सेवा आता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. अनेक अप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही पैशांचे हस्तांतरण किंवा पैशांची डिपॉझिट, इलेक्ट्रिक बिल भरणे किंवा मोबाईल रिचार्जसारख्या अनेक गोष्टींची खरेदी विक्री इत्यादी व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करू शकतात.

असे जरी असले तरी देखील अजून बरेच व्यवहार हे देशात रोख स्वरूपात होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे अशा रोखीने कॅश उपलब्ध व्हावी म्हणून बरेच व्यक्ती एटीएमचा वापर करतात. एटीएमच्या माध्यमातून आपल्याला रोख कॅश मिळते हे आपल्याला माहिती आहे.

जर आपण सध्या देशाचा विचार केला तर तीस लाख कोटी रुपयांची व्यवहार चलनामध्ये म्हणजेच रोख पद्धतीने होत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत एटीएमच्या माध्यमातून काही वेळा बनावट नोटा देखील मिळू शकतात. तसे बघायला गेले तर ही गोष्ट शक्य नाही. परंतु जर दुर्दैवाने असे तुमच्याशी झाले तर तुम्हाला काही गोष्टी ताबडतोब करून तुमचे पैसे परत मिळणे शक्य आहे व त्याकरिता मात्र तुम्हाला ताबडतोब काही गोष्टी करणे गरजेचे आहे. याचं संबंधीचे महत्त्वाची माहिती आपण या लेखात घेऊ.

 नकली नोट आहे असे दिसून आल्यास ताबडतोब करा या गोष्टी

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही एटीएम मधून पैसे काढतात आणि पैसे काढल्यानंतर जर तुम्हाला थोडं जरी वाटलं की ही नोट खरी नसून बनावट आहे तर सर्वप्रथम त्या नोटेचा फोटो घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तात्काळ तुम्ही त्या नोटचा फोटो घ्या.

2- नंतर प्रत्येक एटीएममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला असतो व त्या सीसीटीव्ही कॅमेरा समोर ती नोट अल्टी पलटी करून दाखवणे गरजेचे आहे. यामुळे फायदा असा होईल की तुम्हीच ती नोट त्या एटीएम मधूनच बाहेर काढली आहे म्हणजेच ती त्या एटीएम मधूनच बाहेर आली आहे हे कॅमेराच्या माध्यमातून पुरावा म्हणून तुम्ही रेकॉर्ड करू शकता.

3- त्यानंतर झालेल्या व्यवहाराची पावती घ्या आणि त्या पावतीचा देखील फोटो काढून तो सेव करून घ्या.

4- एटीएमच्या ठिकाणी ही प्रक्रिया केल्यानंतर नोट आणि पावती घेऊन बँकेत जावे. बँकेतील कर्मचाऱ्याला या संपूर्ण प्रकाराची माहिती द्यावी. हे झाल्यानंतर बँक तुम्हाला एक फॉर्म देते व तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ती पावती आणि बनावट नोट सोबत  बँकेला द्यावी लागेल.

5- त्यानंतर बँक बनावट नोट तपासेल आणि नंतर तुम्हाला खरी म्हणजे मूळ नोट परत देईल.

6- परंतु यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पैसे काढत असाल आणि नंतर तुम्हाला बनावट नोट सापडली तर तुम्हाला ही नोट घेऊन मात्र आरबीआयकडे जाणे गरजेचे आहे. त्यासंबंधीची पावती आणि नोट आरबीआयला द्यावी लागेल व आरबीआय त्याची चौकशी करेल. त्यानंतरच तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणे शक्य आहे.

 नोट खरी आहे की खोटी कशी ओळखावी?

तुम्हाला जर बनावट नोट ओळखायची असेल तर त्यासाठी काही महत्त्वाच्या पद्धती तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर शंभर रुपयांची नोट जर तुम्हाला बनावट आहे की खरी हे ओळखायचे असेल तर त्याकरिता शंभर रुपयाच्या नोटाच्या पुढच्या दोन्ही बाजूला देवनागरी लिपी मध्ये लिहिले आहे की नाही हे प्रथम तपासावे.

एवढेच नाही तर नोटेच्या मधोमध महात्मा गांधींचा फोटो आहे की नाही हे देखील बघावे व इतर नोटांच्या पुढील बाजूस सुरक्षा धागा असतो. त्या ठिकाणी तुम्ही टॉर्च किंवा युव्ही प्रकाशात पाहिले तर ते पिवळ्या रंगात दिसते. अशा पद्धतीने देखील तुम्ही खोटे आणि खऱ्या नोटे मधील फरक ओळखू शकता.

 अशा पद्धतीने तुम्ही बनावट नोट मिळून आल्यास ती बँकेकडून परत मिळवू शकतात.