Fixed Deposit : बऱ्याच बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ करून ग्राहकांना खूश केले आहे. अशातच तुम्ही देखील सध्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही अशा बँकांची यादी घेऊन आलो आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.
बँक ऑफ महाराष्ट्र (बीओएम), बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक, ज्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी आहेत, त्यांनी अलीकडेच त्यांच्या एफडीवरील व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने काही एफडीवरील व्याज 125 bps ने वाढवून 1.25 टक्के केले आहे. कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनीही अलीकडेच एफडीवरील व्याज वाढवले आतहे. तुम्हीही दिवाळीच्या दरम्यान गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र
बँक ऑफ महाराष्ट्र 7 दिवस ते 30 दिवस: सामान्य लोकांसाठी – 2.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 2.75 टक्के व्याजदर ऑफर करत आहे. 31 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3 टक्के, 46 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के, 91 दिवस ते 119 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.90 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.40 टक्के, 120 दिवस ते 180 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.60 टक्के, 181 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.00 टक्के, 271 दिवस ते 364 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.60 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.10 टक्के, 365 दिवस किंवा एक वर्ष: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7 टक्के व्याजदर देत आहे.
बँक 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के, 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के, 3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के, 5 वर्षे ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना 200 आणि 400 दिवसांच्या विशेष एफडीवर 7.50% पर्यंत व्याज मिळत आहे. या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना ७ टक्के व्याज मिळत आहे.
कॅनरा बँक
कॅनरा बँक 7 ते 45 दिवसांच्या मुदतीच्या EPD वर 4% व्याजदर ऑफर करत आहे तर 46 ते 90 दिवसांच्या दरम्यानच्या ठेवींवर 5.25% व्याजदर देत आहे. कॅनरा बँक 91 ते 179 दिवसांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 5.50 टक्के व्याजदर आणि 180 ते 269 दिवसांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 6.15 टक्के व्याजदर देत आहे. आता 270 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर 6.25 टक्के व्याजदर मिळेल. आता 1 वर्षात मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर 6.90 टक्के व्याजदर मिळेल. बँक 444 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर सर्वाधिक व्याज देत आहे. बँक ४४४ दिवसांच्या FD वर ७.२५ टक्के व्याज देत आहे.
कॅनरा बँक एक वर्षापेक्षा जास्त ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या FD वर 6.85% व्याज दर देत आहे. तसेच 3 वर्ष, दोन वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या FD वर 6.85% व्याज मिळत आहे. बँक पाच वर्ष किंवा त्याहून अधिक मुदतीच्या FD वर 6.70 टक्के व्याजदर ऑफर करत आहे.
BOB बँक
BOB बँक 7 दिवस ते 14 दिवसांसाठी सामान्य नागरिकांना 3.00 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी: 3.50 टक्के व्याजदर ऑफर करत आहे. बँक 15 दिवस ते 45 दिवसांसाठी 3.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ टक्के व्याज देत आहे. तसेच 46 दिवस ते 90 दिवसांसाठी 5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी: 5.50 टक्के व्याज देत आहे. 91 दिवस ते 180 दिवसांसाठी 5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी: 5.50 टक्के, 181 दिवस ते 210 दिवसांसाठी 5.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6 टक्के व्याजदर देत आहे.
बँक 211 दिवस ते 270 दिवसांसाठी 6 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.50 टक्के व्याजदर ऑफर करत आहे. 271 दिवस आणि त्याहून अधिक आणि 1 वर्षापेक्षा कमी दिवसांसाठी 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.75 टक्के व्याज देत आहे. बँक 1 वर्षासाठी 6.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.25 टक्के व्याज देत आहे. 1 वर्ष ते 400 दिवसांपेक्षा जास्त दिवसांसाठी सामान्य लोकांसाठी: 6.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.25 टक्के व्याज देत आहे.
बँक 400 दिवसांपेक्षा जास्त आणि 2 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.25 टक्के व्याज देत आहे. 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.75 टक्के, 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.00 टक्के, 5 वर्ष ते 10 वर्षांपेक्षा जास्त – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.00 टक्के, 10 वर्षांवरील (कोर्ट ऑर्डर योजना) – सामान्य लोकांसाठी: 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.75 टक्के, 399 दिवस (बडोदा तिरंगा प्लस डिपॉझिट योजना) – सामान्य लोकांसाठी: 7.16 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.65 टक्के व्याजदर ऑफर करत आहे.