BOB E-Mudra Loan: बँक ऑफ बडोदा देईल व्यवसायाकरिता 10 लाखापर्यंत कर्ज! वाचा या कर्ज योजनेची ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BOB E-Mudra Loan:- अनेकांना स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असतो. परंतु व्यवसायासाठी लागणारा पैसा बऱ्याच जणांकडे उपलब्ध नसतो. त्यामुळे व्यवसाय करण्याची इच्छा असताना देखील बऱ्याच व्यक्तींना व्यवसाय उभारता येत नाही. याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून व्यवसाय उभारणी करिता आर्थिक मदत होईल यासाठी अनेक योजना राबवण्यात येतात.

एवढेच नाही तर बँकांच्या माध्यमातून देखील व्यवसाय उभारणीसाठी कर्ज दिले जाते. यामध्ये जर आपण बँक ऑफ बडोदा चा विचार केला तर बँक ऑफ बडोदा ही बँक ही मुद्रा कर्जाच्या स्वरूपात  लहान व्यवसायांना आर्थिक पुरवठा करण्यासाठी ई मुद्रा योजनेच्या माध्यमातून मदत करते.

मुद्रा लोन हे लहान व्यवसायांसाठी  महत्वाचे असे कर्जाचे स्वरूप असून लहान व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करता यावी याकरिता आवश्यक निधी या माध्यमातून उपलब्ध होतो व व्यवसाय वाढण्यास व त्याचा विस्तार करण्यास व्यावसायिकांना मदत होते.

प्रामुख्याने ई मुद्रा लोन हे उत्पादन, सेवा तसेच व्यापार आणि कृषी यासह विविध क्षेत्रातील व्यवसायांकरिता कर्ज उपलब्ध करून देते. व्यवसायामध्ये यंत्रसामग्री पासून तर खेळते भांडवल, व्यवसायासाठी लागणारे आवश्यक उपकरणाची खरेदी तसेच व्यवसायाचा विस्तार आणि विकास इत्यादी संबंधित खर्चाकरिता हे कर्ज खूप फायद्याचे ठरू शकते.

 बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या मुद्रा कर्जाचे स्वरूप

बँक ऑफ बडोदा कडून मुद्रा कर्ज योजनेच्या माध्यमातून 50000 पासून ते दहा लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जातात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार या कर्जाकरिता अर्ज करू शकता.

या योजनेअंतर्गत कर्ज घेतले तर त्याचा परतफेड कालावधी हा 12 महिने ते 84 महिन्यांचा आहे. म्हणजेच कर्ज घेणारा व्यक्ती हा त्याची सोयीनुसार व कर्जाच्या किमतीनुसार त्या कर्जाचे हप्ते बारा महिने ते 84 महिन्यांपर्यंत  निश्चित करू शकतो. विशेष म्हणजे बँक ऑफ बडोदा कडून या कर्जाकरिता कुठल्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क आकारले जात नाहीत.

गरज लोकांना कमीत कमी वेळेमध्ये पैसे उपलब्ध व्हावेत म्हणून प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पन्नास हजार रुपये पर्यंतचे रक्कम अगदी पाच मिनिटात बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून ग्राहकाला त्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.

 बँक ऑफ बडोदा मुद्रा लोनकरीता

आवश्यक कागदपत्रे

1- आयडेंटी प्रूफ म्हणून सरकारने जारी केलेले जे काही कागदपत्रे आहेत ते म्हणजे जसे की पॅन कार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट इत्यादी कागदपत्रे लागतात.

2- ऍड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही बँक स्टेटमेंट किंवा इलेक्ट्रिसिटी बिल किंवा भाडेकरार इत्यादी देऊ शकतात.

3- बिझनेस प्रूफ करिता तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा पुरावा म्हणून जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र किंवा व्हॅट नोंदणी प्रमाणपत्र देणे गरजेचे असते.

4- तसेच फायनान्शिअल डॉक्युमेंट्स करिता तुम्हाला बँकेचे स्टेटमेंट तसेच नफा आणि तोटा स्टेटमेंट बॅलन्स शीट इत्यादी कागदपत्र द्यावे लागते कारण यावरून तुम्ही कर्ज परतफेड करण्यासाठी सक्षम आहेत हे बँकेला कळते.

 बँक ऑफ बडोदा मुद्रा लोनकरिता ऑनलाइन अर्ज कसा करावा?

1- त्याकरता तुम्हाला सगळ्यात अगोदर बँक ऑफ बडोदाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल व त्या ठिकाणी ऑनलाइन अर्ज करा यावर क्लिक करावे लागेल.

2- यामधून तुम्हाला जी काही कर्ज उत्पादनांची उपलब्ध सूची असेल त्यामधून ई मुद्रा कर्जाची निवड करणे गरजेचे आहे.

3- नंतर अर्ज करताना तुमची वैयक्तिक आणि व्यावसायिक माहिती व्यवस्थित भरणे गरजेचे आहे व त्यासोबत तुमचा कॉन्टॅक्टचा तपशील आणि आर्थिक माहितीसह आवश्यक तपशील अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.

4- नंतर विचारलेली सगळी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे. यामध्ये तुम्हाला ओळखीचा पुरावा तसेच पत्त्याचा पुरावा, व्यवसायाचा पुरावा आणि इतर आर्थिक कागदपत्रे लागतील.

5- व्यवस्थितपणे अर्ज भरून झाल्यानंतर अर्जामध्ये भरलेली पूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्यावी व ऑनलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करा.

7- ऑनलाइन पद्धतीने सबमिट केल्यानंतर बँकेच्या माध्यमातून तो अर्ज व्हेरिफाय केला जातो. तुम्ही जर बँकेचे नियम व अटी पूर्ण करत असाल तर बँक तुमच्याशी त्या संबंधित संपर्क करते. कर्ज मंजूर झाले तर कर्जाची रक्कम याविषयी तुम्हाला काही सूचना देखील देते किंवा तुम्हाला सूचना प्राप्त होतात.

पद्धतीने तुम्ही अगदी कमीत कमी वेळेत बँक ऑफ बडोदा कडून व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकतात.