Business Idea : कमी भांडवलात सुरू करा हा व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये! शेती करत असताना हा व्यवसाय बनवेल श्रीमंत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : व्यवसायांची यादी पाहिली तर अनेक व्यवसाय असे आहेत की ते प्रामुख्याने शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या कच्च्या मालावर आधारित आहेत. त्यामध्ये प्रक्रिया उद्योग सुरू करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची गरज असते व त्या पद्धतीने नियोजन देखील लागते. परंतु असे अनेक व्यवसाय आहेत की ते कमीत कमी पैसे लावून देखील उत्तम पद्धतीने सुरू करता येऊ शकतात व चांगला पैसा देखील आपल्याला त्या माध्यमातून मिळू शकतो.

कारण कुणाला जरी व्यवसाय सुरू करायचा असेल तर प्रत्येकजण कमीत कमी भांडवलात चांगला नफा मिळणाऱ्या  व्यवसायाच्या शोधात असतात. अशा अनेक व्यवसायांची यादी आपल्यासमोर येते परंतु यातून कोणत्या व्यवसायाची निवड करावी या बाबतीत बऱ्याचदा गोंधळ उडतो. त्यामुळे गोंधळ न होऊ देता व्यवस्थित बाजारपेठेची मागणी व इतर बाबी लक्षात घेऊन व्यवसायाची निवड करणे गरजेचे असते.

याच मुद्द्याला धरून आपण या लेखांमध्ये कमीत कमी गुंतवणुकीत आणि भरपूर मागणी असणाऱ्या व्यवसायाची माहिती बघणार आहोत आणि तो व्यवसाय म्हणजे  केळीची पावडर बनवण्याचा व्यवसाय होय. कारण या व्यवसायाला आता खूप मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असून केळीची पावडर अनेक ठिकाणी वापरली जात असल्यामुळे तिची मागणी देखील वाढत आहे. त्यामुळे कमीत कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवून देणार हा व्यवसाय असल्यामुळे तुम्ही केळीची पावडर बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात.

 अशा पद्धतीने सुरू करा हा व्यवसाय

सर्वप्रथम हा व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता भासते. केळीची पावडर तयार करण्याकरता तुम्हाला मशीनची आवश्यकता असते व एक ड्रायर मशीन आणि दुसरे मिक्सिंग मशीन अशी दोन प्रकारचे मशीन तुम्हाला लागतात. यातील केळीची पावडर बनवण्याची मशीन बाजारामध्ये 15 ते 20 हजार रुपयांमध्ये तुम्हाला मिळते व तुम्ही ती ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्गाने खरेदी करता येते.

तसेच कच्चामाल म्हणून तुम्हाला केळीची गरज भासेल. ही केळी तुम्हाला बाजारातून कमीत कमी दरामध्ये मिळू शकते तसेच तुम्ही केळी उत्पादक शेतकऱ्यांशी संपर्क करून त्यांच्याकडून देखील केळीची खरेदी करू शकतात. यामध्ये जर तुम्ही शेतकऱ्यांकडून थेट केळी खरेदी केली तर तुम्हाला कमी भावात चांगल्या दर्जाची केळी मिळू शकते.

 केळीची पावडर कशा पद्धतीने बनवतात?

केळीची पावडर बनवण्याकरिता तुम्हाला सोडियम हायपोक्लोराइडच्या द्रावणामध्ये केळी स्वच्छ धुऊन घ्यावी लागेल व नंतर तिला सोलून तुम्ही सायट्रिक ऍसिडच्या द्रावणात पाच मिनिटे ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर सायट्रिक ऍसिडच्या द्रावणातून केळी बाहेर काढून ती 24 तास वाळवणे महत्त्वाचे असून त्यानंतर तिची छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये टाकून तिला बारीक करून घ्यावे. जोपर्यंत केळ्यांची पावडर तयार होत नाही तोपर्यंत ती केळी मिक्सरमध्ये बारीक करत राहावी. अशा पद्धतीने तुम्ही केळीची पावडर तयार करू शकतात.

 या व्यवसायातून किती पैसा कमावता येईल?

जर आपण बाजाराचा विचार केला तर सध्या 800 ते 1000 रुपये प्रति किलो केळ्याच्या पावडरचे दर आहेत. तुम्ही दिवसाला पाच किलो केळ्याची पावडर बनवली तरी तुम्ही सहजपणे एका दिवसाला चार ते पाच हजार रुपये कमवू शकतात. ज्या पद्धतीने तुमचा व्यवसाय वाढत जाईल त्या पद्धतीने तुमचा नफा देखील वाढत जाईल.

 केळीच्या पावडरचे उपयोग काय?

केळीच्या तयार पावडरचा वापर हा शरीराला फिट ठेवण्यासाठी तसेच चेहऱ्याच्या सौंदर्य वाढवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो. रक्तदाब नियंत्रण करण्याकरिता व पाचनशक्ती मजबूत करण्यासाठी देखील ही पावडर खूप फायदेशीर आहे. सौंदर्याच्या दृष्टीने चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी व त्वचा मऊ होण्याकरिता देखील केळीची पावडर वापरली जाते. त्यामुळे मागणी चांगली असल्याने हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतो.