Business Idea:- व्यवसाय करायचे म्हटले म्हणजे साधारणपणे सगळ्यात प्रमुख समस्या प्रत्येकासमोर येते ती म्हणजे त्या व्यवसायासाठी लागणारे पैसे किंवा भांडवल हे होय. कारण या जगामध्ये कुठलीही गोष्ट पैशाशिवाय होत नाही. त्यामुळे याला व्यवसाय देखील अपवाद नाही.
परंतु व्यवसायामधील गुंतवणुकीचा विचार केला तर यामध्ये तुमचे व्यवसायाचे स्वरूप म्हणजे तो तुम्ही मोठ्या प्रमाणावर सुरू करणार आहात की छोट्या स्वरूपामध्ये यावर प्रामुख्याने अवलंबून असते. तसेच दुसरे म्हणजे मोठी गुंतवणूक करून सुरू केलेल्या व्यवसायातून मोठा नफा मिळतो असेही काही नाही.
तुम्ही जो काही व्यवसाय करत आहात त्या व्यवसायाची मागणी यावर त्या व्यवसायाचे आर्थिक नफा तोट्याचे गणित हे ठरलेले असते. कधी कधी मोठ्या गुंतवणूक केलेल्या व्यवसायामधून जितका नफा मिळत नाही तितका नफा हा अगदी छोट्याशा गुंतवणुकीतून सुरू केलेल्या व्यवसायातून मिळतो.
असेल प्रकारे छोट्या गुंतवणुकीतून सुरू केलेले व्यवसाय देखील आपल्याला दिवसाला हजार रुपयांची कमाई करून देऊ शकतात. अगदी याच पद्धतीने जर आपण पाहिले तर बटाटा चिप्स बनवण्याचा व्यवसाय हा तुम्ही अगदी कमीत कमी खर्चामध्ये सुरू करून दिवसाला एक हजार रुपये आरामात कमवू शकता. विशेष म्हणजे यासाठी फक्त तुम्हाला 850 रुपयांची एक मशीन घेणे गरजेचे आहे.
850 रुपयांची एक मशीन घ्या आणि बटाटा चिप्स बनवायला सुरुवात करा
साधारणपणे जर आपल्याला कुठलेही प्रकारचे मशीन घ्यायचे म्हटले म्हणजे ते दहा हजार रुपयांच्या पुढेच मिळते असा एक समज असतो. परंतु एक मशीन असे आहे की तुम्ही त्याला फक्त 850 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात व घरच्या घरी बटाटा चिप्स बनवून पैसे कमवू शकतात.
त्यानंतर हळूहळू व्यवसायात वाढ करून गुंतवणूक वाढवून व्यवसायाचा विस्तार करू शकतात. बटाटा चिप्स बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हे 850 रुपयाचे मशीन व कच्च्या मालाकरिता साधारणपणे पाचशे रुपये इतके भांडवल गुंतवून तुम्ही घरी बसल्या हा व्यवसाय सुरू करू शकतात.
हे मशीन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने विकत घेऊ शकतात व साध्या टेबलवर ठेवून तुम्ही यापासून चिप्स बनवू शकता. विशेष म्हणजे ह्या मशीनला जास्त जागा देखील लागत नाही आणि चालवण्यासाठी विजेची देखील आवश्यकता नाही. हे हाताने ऑपरेट होणारे मशीन असून अगदी घरातील मुलं व महिला देखील हे मशीन आरामात ऑपरेट करू शकतात.
चिप्स विक्री कशी वाढवाल?
सध्या केळी वेफर्स किंवा बटाटा वेफर्स मोठ्या प्रमाणावर खाण्याचा ट्रेंड असून त्यांची मागणी देखील चांगली आहे. यामध्ये बरेच ग्राहक समोर चिप्स तळायला लावतात व खातात व त्यालाच पसंती देतात. त्यामुळे तुम्ही एखादा स्टॉल किंवा दुकान उघडून ताजे चिप्स तळून विकू शकतात. तसेच चिप्स तयार करून त्याची व्यवस्थित पॅकेटमध्ये पॅकिंग करून विक्री करू शकतात. अशा प्रकारे पॅकिंग करून चिप्स विक्री करण्यासाठी तुम्ही तुमच्या परिसरातील दुकानदारांशी संपर्क साधून हळूहळू नेटवर्क वाढवून हा व्यवसाय मोठा करू शकतात.
किती मिळू शकतो नफा?
बटाटा चिप्स बनवण्यासाठी तुम्हाला कच्चामाल खरेदी करण्यासाठी जितका पैसा लागतो त्यापेक्षा पाच ते सहा पट तुम्हाला जास्त पैसा या माध्यमातून मिळतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर साधारणपणे एका दिवसाला जर तुम्ही दहा किलो चिप्स बनवले व त्यांची विक्री केली तर सहजपणे तुम्ही एका दिवसाला एक हजार रुपये कमाई करू शकतात. यासाठी तुम्हाला जास्त खर्च व गुंतवणूक करण्याची देखील गरज भासत नाही.