Business Idea : होईल तिप्पट कमाई! फक्त सुरु करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय, अशी करा सुरुवात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : जर तुम्ही तुमच्या नोकरीला वैतागला असाल आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप कामाची आहे. आता तुम्ही कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देणारा तुमचा व्यवसाय सुरु करू शकता.

समजा तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरु करायचा असेल आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करू नका. तुम्ही सरकारी मदत घेऊन व्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायात तुम्हाला नोकरीपेक्षा जास्त कमाई करता येईल.

सध्याच्या काळात जवळपास प्रत्येक घरात साबण वापरण्यात येतो. त्यामुळे गाव असो किंवा शहर असो साबण हा दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आता अशा परिस्थितीत जर तुम्ही साबणाचा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला चांगला नफा मिळवता येईल. सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बाब म्हणजे या व्यवसायात तुमचे नुकसान होण्याची शक्यता खूपच कमी आहे, यामागचे कारण म्हणजे त्याची मागणी वर्षभर राहते.

घरी बसून सुरु करता येईल व्यवसाय

साबणाचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर एका जागेची गरज पडणार आहे. समजा तुम्हाला हा व्यवसाय कमी प्रमाणावर सुरू करायचे असेल तर तुम्हाला किमान 750 चौरस फूट जमिनीची गरज पडणार आहे. तर दुसरीकडे, जर तुमचे घर मोठे असल्यास तर तुम्ही तो व्यवसाय तुमच्या घरापासूनही सुरू करू शकता. हे लक्षात घ्या की साबण बनवण्यासाठी तुम्हाला मशीनचीही गरज असणार आहे.

जाणून घ्या खर्च आणि नफा

हे लक्षात घ्या की तुम्हाला एक साबण डिस्पेंसर खरेदी करायचा असेल तर तुम्हाला एकूण 1 लाख रुपयांची गरज असणार आहे. जर सर्व खर्चाबद्दल बोलायचे झाले तर तर दुकान खरेदी करण्यापासून ते कर्मचारी आणि मशीनच्या खर्चापर्यंत तुम्हाला सुरुवातीला 4 ते 5 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर दुसरीकडे, एकदा तुमचा व्यवसाय सुरू झाला की तुम्हाला त्यातून 30 ते 35 टक्क्यांचा नफा मिळवता येईल.

साबणाचे प्रकार

हा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी हे जाणून घ्या की साबणाचे खूप प्रकार आहेत. यामध्ये भांडी धुण्यासाठी साबण तसेच आंघोळीसाठी साबण, कपडे धुण्यासाठी साबण, चेहरा धुण्यासाठी साबण आणि इतर सौंदर्यप्रसाधनांमध्येही साबण वापरले जातात. त्यामुळे बाजारात त्यांची किंमतही बदलते.