Post Office : सप्टेंबरच्या अखेरीस लहान बचत योजनांच्या व्याजदरात होणार बदल, जाणून घ्या…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Saving Schemes : RBI ने ऑगस्ट 2023 मध्ये आपल्या पतधोरण बैठकीत रेपो दरात कोणताही बदल केला. तथापि, देशातील महागाई दर अजूनही आरबीआयने निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत देशात सुरू असलेल्या अनेक बचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्यात आला आहे. आता सप्टेंबरच्या अखेरीस म्हणजेच २९ किंवा ३० सप्टेंबर रोजी अल्पबचत योजनेवरील व्याजदर पुन्हा एकदा बदलले जातील. याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

तुमच्या माहितीसाठी अल्पबचत योजनेचे व्याजदर, दर तिसऱ्या महिन्यात बदलले जातात. ३० जून रोजी झालेल्या शेवटच्या बदलात व्याजदरात वाढ करण्यात आली होती. यापूर्वी एप्रिल ते जून या तिमाहीसाठी व्याजदरातही वाढ करण्यात आली होती. 30 जून रोजी झालेल्या शेवटच्या बदलामध्ये, सरकारने 1-वर्ष आणि 2-वर्षीय पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवरील दर 10 bps पर्यंत वाढवले ​​होते.

त्यानंतर यासाठीचा व्याजदर ६.९ टक्के आणि ७ टक्के झाला. आर्थिक वर्ष 2020-121 ते 2022-23 या कालावधीत लघु बचत योजनेच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान पुन्हा एकदा अल्पबचत योजनेच्या व्यजदरात वाढ होण्याची शक्यता आहे.

छोटी बचत योजना काय आहे?

बचत आणि गुंतवणुकीच्या संदर्भात, सरकार लोकांना विविध प्रकारच्या लहान बचत योजनांचे लाभ प्रदान करते. या योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जातात. बचत आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने या योजना खूप चांगल्या सिद्ध होऊ शकतात. पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

या योजनांमध्ये तुम्हाला सरकारी सुरक्षा हमी मिळते. म्हणजे यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. या व्यतिरिक्त, तुम्हाला खूप चांगल्या व्याजदरांवर उत्कृष्ट परतावा देखील मिळतो. तुम्ही अनेक योजनांमध्ये कर कपातीसारखे फायदे देखील घेऊ शकता.