Bank Rule Change:- आज एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस असून उद्यापासून मे महिन्याला सुरुवात होत आहे. या अनुषंगाने प्रत्येक महिन्याला ग्राहकांच्या संदर्भातील काही नियमांमध्ये बदल होतात व त्याचा प्रत्यक्षपणे परिणाम हा जनतेवर होत असतो. आपल्याला प्रत्येक वेळी माहिती आहे की प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलेंडर, सीएनजी तसेच काही बँकांच्या खात्यासंदर्भात नियमात देखील बदल केले जातात.
या अशाप्रकारे बदल केल्यामुळे त्याचा थेट परिणाम हा ग्राहकांच्या आर्थिक परिस्थितीवर होतो. अगदी प्रत्येक महिन्याप्रमाणे उद्यापासून सुरू होणाऱ्या मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारतातील तीन महत्त्वाच्या बँकांनी काही नियमांमध्ये बदल केले असून त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिश्यांवर होणार आहे. मे महिन्यापासून पैशाशी संबंधित अनेक नियमात या बँकांनी बदल केलेले आहेत. नेमके त्या बँका कोणत्या आहेत व त्यांनी कोणत्या नियमात बदल केलेले आहेत? याची माहिती आपण बघू.
एक मे पासून या बँकांच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल
1- सेविंग कार्डशी संबंधित नियमात आयसीआयसीआय बँकने केला बदल– आयसीआयसीआय बँकेने सेविंग कार्डशी संबंधित नियमांमध्ये काही मोठा बदल केला असून या बदलानुसार जर आता पाहिले तर ग्रामीण भागातील जे बँकेचे ग्राहक आहेत त्यांना डेबिट कार्डसाठी 99 रुपये आणि शहरी भागातील ग्राहकांना डेबिट कार्ड करिता दोनशे रुपये वार्षिक रक्कम भरणे गरजेचे राहणार आहे.
तसेच आयसीआयसीआय बँकेचे जे काही पंचवीस पानांचे चेकबुक असते त्याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. परंतु 25 पानांव्यतिरिक्त जर चेक बुक मागवले तर प्रत्येक पानाकरिता ग्राहकांना चार रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे आयएमपीएस व्यवहाराची रक्कम दोन रुपये 50 पैसे ते पंधरा रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
2- येस बँकेने बदललेले नियम– येस बँकेने देखील बचत खात्यासाठी मिनिमम बॅलन्स म्हणजेच किमान सरासरी शिल्लक ठेवण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. या बदलानुसार बघितले तर येस बँकेच्या प्रोमॅक्स बचत खात्यासाठी किमान सरासरी शिल्लक आता 50 हजार रुपये करण्यात आलेली आहे आणि कमाल शुल्क 1000 रुपये करण्यात आले आहे.
या व्यतिरिक्त येस बँकेचे प्रॉ प्लस, येस रिस्पेक्ट एसए आणि येस इसेन्स एसए खात्यासाठी किमान सरासरी शिल्लक मर्यादा 25 हजार रुपये आणि कमाल शुल्क साडेसातशे रुपये इतके असणार आहे. याव्यतिरिक्त अकाउंट प्रो प्रकारच्या खात्यामध्ये किमान शिल्लक आता दहा हजार रुपये ठेवणे बंधनकारक राहील आणि कमाल शुल्क साडेसातशे रुपये करण्यात आले आहे.
3- एचडीएफसी बँक– एचडीएफसी बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन योजना या महिन्यात सुरू केलेली आहे व याची मुदत 10 मे पर्यंत असणार आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 0.75% अतिरिक्त व्याजदर बँकेकडून देण्यात येणार आहे.तर पाच ते दहा वर्षांंकरता पैसे गुंतवले तर त्यावर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्क्यांचा व्याजदर केलेल्या एफडीवर मिळणार आहे.