Top 5 Share : गुंतवणुकदारांचा पैसा एका महिन्यात दुप्पट; पहा टॉप 5 शेअर्सची यादी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Top 5 Share : बऱ्याच काळापासून शेअर बाजारात मोठी घसरण होताना दिसत आहे, असे असतानाही अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. आज आपण अशाच शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी कालावधीत श्रीमंत केले आहे. या शेअर्सनी एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे.

शेअर बाजारात जरी घसरण सुरु असली तरी, असे अनेक छोटे किंवा कधी-कधी पेनी स्टॉक्स चांगला परतावा देतात. सध्या शेअर बाजार मोठ्या घसरणीच्या काळातून जात असताना अनेक शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना एका महिन्यात दुप्पट परतावा दिला आहे. कोणते आहेत हे स्टॉक्स चला पाहूया…

साधारणपणे, 10 रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या स्टॉकला पेनी स्टॉक म्हणतात. पण इथे 10 ते 20 रुपयांच्या शेअर्सचे 1 महिन्याचे रिटर्न सांगितले आहेत. या सर्व शेअर्सनी एका महिन्यात गुंतवणूकदारांना 100% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

क्रेन इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर दर महिन्यापूर्वी 13.40 रुपयांच्या पातळीवर होता. तर आता या शेअरचा दर 30.75 रुपये झाला आहे. अशा प्रकारे या शेअरने एका महिन्यात 129.48% परतावा दिला आहे.

जेएमजे फिनटेकचा शेअर मागील महिन्यापूर्वी 13.90 रुपयांच्या पातळीवर होता. तर आता या शेअरचा दर ३०.९० रुपये झाला आहे. अशा प्रकारे या स्टॉकने एका महिन्यात 122.30% परतावा दिला आहे.

एशियन वेअरहाऊसिंगचा शेअर दर महिन्यापूर्वी 14.03 रुपयांच्या पातळीवर होता. आणि आता या शेअरचा दर 29.95 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका महिन्यात 113.47% परतावा दिला आहे.

Ajel Ltd च्या शेअरचा दर महिन्यापूर्वी 8.15 रुपयांच्या पातळीवर होता. आणि आता या शेअरचा दर 17.36 रुपये आहे. अशा प्रकारे, या स्टॉकने एका महिन्यात 113.01% परतावा दिला आहे.

फ्रँकलिन इंडस्ट्रीजचा शेअर दर महिन्यापूर्वी 12.70 रुपयांच्या पातळीवर होता. आणि आता या शेअरचा 26.98 रुपयांवर व्यवहार करत आहे. अशा प्रकारे या शेअरने एका महिन्यात 112.44% परतावा दिला आहे.