Cibil Score Increase Tips: तुमचा घसरलेला सिबिल स्कोर 750 च्या वर न्यायचा असेल तर ‘या’ टिप्स वापरा! होईल फायदा

Ajay Patil
Published:
increase cibil score tips

Cibil Score Increase Tips:- सिबिल स्कोर ही संकल्पना आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असून तुम्हाला कुठल्याही बँकेतून कर्ज ताबडतोब मिळण्यासाठी सिबिल स्कोर चे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्याला माहित आहे की सिबिल स्कोरची साधारणपणे 300 ते 900 या दरम्यान गणना केली जाते.

साधारणपणे 750 च्या वर क्रेडिट स्कोर असेल तर तो एक आदर्श स्कोर समजला जातो. परंतु जर 750 च्या खाली तुमचा सिबिल स्कोर असेल तर मात्र तुम्हाला कर्ज मिळण्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होतात. सिबिल स्कोर कमी असेल तर तुम्हाला कर्ज मिळत नाही

परंतु जर मिळाले तर त्याला व्याजदर जास्तीचा लागतो. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर घसरलेला असेल किंवा आहे तो क्रेडिट स्कोर तुम्हाला टिकवून ठेवायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही काही गोष्टी कसोशीने पाळणे गरजेचे आहे. त्याविषयीची माहिती आपण या लेखात बघू.

 घसरलेला क्रेडिट स्कोर कसा सुधाराल?

1- सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचा सिबिल स्कोर कमी असण्यामागे कुठली कारणे आहेत हे तपासणे गरजेचे आहे. याकरिता तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासून पाहणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला जर तुमचा क्रेडिट स्कोर ताबडतोब वाढवायचा असेल तर त्याकरिता तुमच्या स्कोरवर निगेटिव्ह इम्पॅक्ट करणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत याचे पुनरावलोकन करणे महत्त्वाचे आहे.

तुमचा क्रेडिट स्कोर कमी असण्यामध्ये तुमच्या क्रेडिट हिस्ट्री मध्ये काही विसंगती कारणीभूत असू शकतील व या विसंगतींचे निराकरण करणे शक्य असेल तर या विसंगतीचे निराकरण केल्याने तुमचा क्रेडिट स्कोर सुधारू शकतो.

2- तसेच तुम्ही एखादे कर्ज फार पूर्वी फेडलेले असेल व अशा फेडलेल्या कर्जासाठी आणि तुम्हाला माहित नसलेल्या खात्यांसाठी तुमच्या अहवालाची तपासणी करा व यामध्ये काही चुकी असल्यास त्याचे निराकरण करा.

3- तसेच काही मोठी कर्ज असतील तर ते फेडा आणि तुमच्या क्रेडिट कार्डचा वापराचे प्रमाण तुमच्या कार्डच्या लिमिटच्या 30% किंवा त्याहून कमी ठेवा.

4- तुम्ही घेतलेल्या कर्जाचा ईएमआय वेळेवर भरा. जर तुम्ही ईएमआय वेळेवर भरला नाही तर तुमचा क्रेडिट स्कोर घसरण्याची शक्यता वाढते. तुम्ही वाहन तसेच होमलोन सारखी मोठी कर्ज घेतली असतील तर त्या कर्जाची परतफेड करण्याला प्राधान्य द्या. क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याचे हप्ते वेळेवर भरा.

5- तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमच्या घरगुती वापराची बिल जसे की वीज, पाणी, गॅस किंवा फोन  इत्यादी बिलांची माहिती यामध्ये समाविष्ट नसते. परंतु ही बिले देखील देय तारखेला भरणे गरजेचे आहे. जर यांची बिले वेळेवर भरली नाही तर एखाद्या वेळेस तुमचा कर्ज प्रदाता तुमचे कर्ज एखाद्या वसुली वितरकाकडे पाठवू शकतो व त्यांना तुमचा क्रेडिट अहवालावर डिफॉल्ट रेकॉर्ड करण्यास सांगू शकतो.

6- तसेच क्रेडिट कार्डच्या वापराचे प्रमाण कमीत कमी ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक वस्तूच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर करू नये. क्रेडिट कार्डचा युटिलायझेशन रेशो 30% किंवा त्यापेक्षा कमी ठेवणे चांगले असते. म्हणजेच तुमचा कार्डचा लिमिट जर दहा हजार रुपये असेल तर तुम्ही 3000 च्या वर त्याचा वापर करू नये. अशा पद्धतीने जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरले तर तुमचा सिबिल स्कोरवर त्याचा खूप पॉझिटिव्ह परिणाम होतो.

7- तसेच तुमचे कर्ज फेडण्याकरिता तुमच्याकडे रोख रक्कम नसल्यास तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. जसे की, शिल्लक हस्तांतरण क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकतात. असेच तुमचे जुने कर्ज नवीन बॅलन्स ट्रान्सफर क्रेडिट कार्डवर हलवण्याचा विचार करा. क्रेडिट लाईन वाढवण्याची विनंती करा.

तुमचा क्रेडिट रेशो त्वरित वाढवायचा असेल तर तुमची क्रेडिट लाईन वाढवणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही वेळेवर पैसे भरत असाल आणि कर्जदाते संस्थेची तुमचे संबंध चांगले असणे यासाठी महत्त्वाचे आहे. कर्ज लाईन वाढीचा तुमच्या वापर मर्यादेवर कर्ज फेडणे इतका सकारात्मक परिणाम होतो.

8- तुमच्या क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी सातत्याने निरीक्षण करणे आणि त्यावर काम करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही याची सुरुवात जितक्या लवकर कराल तितका लवकर तुमचा क्रेडिट स्कोर वाढेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe