Credit Card: ‘या’ बँकेने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणले खास क्रेडिट कार्ड! कर्मचाऱ्यांना मिळणार विशेष फायदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Credit Card:- सध्या क्रेडिट कार्ड वापरायचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक बँकांच्या माध्यमातून विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड जारी केले जातात. बरेच व्यक्ती आता शॉपिंग किंवा इतर बऱ्याच कारणांकरिता क्रेडिट कार्डचा  वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केला तर सरकारी  कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून फायद्याचे ठरेल असे क्रेडिट कार्ड इंडसइंड बँकेने लॉन्च केले असून हे क्रेडिट कार्ड नक्की सरकारी क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरणार आहे. हे क्रेडिट कार्ड प्रामुख्याने सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून लॉन्च करण्यात आलेले आहे. याच क्रेडिट कार्डची माहिती आपण या लेखात घेऊ.

 इंडसइंड बँकेने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लॉन्च केले क्रेडिट कार्ड

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सरकारी कर्मचाऱ्यांना लक्षात घेऊन इंडसइंड बँकेने नुकतेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयच्या भागीदारीत यूपीआय कार्यक्षमते सोबतच एक नवीन इंडसइंड बँक सन्मान रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे.

हे क्रेडिट कार्ड खास सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी लॉन्च करण्यात आलेले असून यामध्ये पारंपारिक क्रेडिट कार्ड चे फायदे यूपीआयच्या फायद्यांसह एकत्रित करण्यात आलेले आहेत. इंडसइंड बँक सन्मान रूपे क्रेडिट कार्ड हे वापरण्यासाठी एक अतिशय सोपा असा आर्थिक पर्याय म्हणून पुढे आणण्यात आलेला आहे.

या कार्डच्या माध्यमातून अनेक प्रकारचे फायदे दिले जात आहेत. उदाहरणच घ्यायचे झालं तर या क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट केल्यावर कॅशबॅक, चित्रपटाची तिकिटे तसेच आयआरसीटीसी व्यवहार आणि पेट्रोल खरेदीवर कोणताही अधिभार म्हणजे सरचार्ज लागणार नाही. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डेलीचे पेमेंट करण्यासाठी एक सोपी पद्धत असणार आहे.

याबाबत बोलताना इंडसइंड बँकेचे ग्राहक बँकिंग आणि विपणन प्रमुख सौमित्र सेन यांनी म्हटले की, सर्व सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना चांगली मूल्य आणि सुविधा मिळाव्यात याकरिता इंडसइंड बँक सन्मान रुपी क्रेडिट कार्ड सुरू करताना आम्हाला आनंद होत असून आम्ही त्यांच्या गरजा समजून हे कार्ड लॉन्च केलेले आहे. त्यामुळे नक्कीच हे क्रेडिट कार्ड सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल हे मात्र निश्चित.