Credit Card:- सध्या पर्सनल लोन, होम लोन तसेच कारलोन घेण्याचे प्रमाण वाढले आहे व त्यासोबतच क्रेडिट कार्डचा वापर देखील दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे. अशाप्रकारे कर्ज घेणे किंवा क्रेडिट कार्डचा वापर करणे हे बहुतांशी तसे फायद्याचे असते.
परंतु कर्जाचे नियमन किंवा क्रेडिट कार्ड वापराचे नियमन योग्य पद्धतीने करणे व स्वतःला आर्थिक शिस्त लावणे देखील यामध्ये गरजेचे असते. नाहीतर सोयी ऐवजी तुम्ही या सगळ्या प्रकारातून कर्जाच्या विळख्यात अडकण्याची शक्यता जास्त असते. सध्या क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे व क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे अनेक फायदे देखील मिळतात.
कारण क्रेडिट कार्ड कंपन्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन ऑफर्स आणि फीचर्स देखील लाँच करत असतात. फक्त त्याबद्दल आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर क्रेडिट कार्ड वापरताना बऱ्याचदा आपल्याला रिवार्ड पॉईंट मिळतात.
परंतु ते रीडिम कसे करावे म्हणजे त्याचा वापर कसा करावा हे आपल्याला माहीत नसते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही तुमच्या या रिवार्ड पॉईंटचा वापर तुमचे क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी करू शकतात. परंतु याचा वापर कसा करावा आहे हे माहीत नसल्यामुळे याबद्दलची महत्त्वाची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
रिवार्ड पॉईंट कॅश केले जातात
तुम्हाला मिळालेले रिवार्ड पॉईंट रीडिम करून तुम्हाला वापरता येऊ शकतात हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. ग्राहकाला वेगवेगळ्या क्रेडिट कार्डवर विविध प्रकारचे रिवार्ड पॉईंट मिळत असतात. जे वाउचर खरेदी करण्यासाठी किंवा कॅशबॅकसाठी वापरता येऊ शकतात.
क्रेडिट कार्ड कंपन्या ज्या काही ऑफर देतात त्यामध्ये बऱ्याचदा तुमचे रिवार्ड पॉईंट रोख कॅशमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करता येऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्ही रिवार्ड पॉईंट्स कॅश करून तुम्ही क्रेडिट कार्डचे प्रलंबित असलेली बिल देखील भरू शकतात.
परंतु हे तुमचे बिल किती प्रलंबित आहे व आतापर्यंत किती रिवार्ड पॉईंट तुम्ही मिळवले आहेत यावर ते सगळे अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही याच्या मदतीने संपूर्ण बिल देखील भरू शकतात किंवा बिलाचा काही भाग भरू शकतात. यामध्ये मिळणाऱ्या रिवार्ड पॉईंटचे मूल्य हे वेगवेगळ्या कार्डवर वेगवेगळे असू शकते.
रिवार्ड पॉईंटचा वापर कसा करावा?
याकरिता तुम्हाला तुम्ही जे काही क्रेडिट कार्ड वापरतात त्यावर ही सुविधा उपलब्ध आहे की नाही हे शोधणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही यापुढे एखादे क्रेडिट कार्ड घ्याल तेव्हा तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड जारी कर्त्याला विचारू शकता की ते तुम्हाला रिवार्ड पॉईंट कॅशमध्ये रूपांतरीत करण्याचे वैशिष्ट्ये देत आहेत की नाहीत.
जर तुम्ही घेत असलेल्या कार्डवर ही सुविधा असेल तर तुम्ही तुमच्या बँक किंवा क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या कंपनीच्या वेबसाईटवर जा आणि तुमचे रिवार्ड पॉईंट रोखीत ट्रान्सफर करा.
त्यानंतर बिल पेमेंट पर्याय निवडावा जेणेकरून ही रोख रक्कम तुमच्या क्रेडिट कार्ड बिलाच्या पुढील बिलिंग सायकलमध्ये समायोजित केली जाते. अशा पद्धतीने तुम्ही रिवार्ड पॉईंटचा वापर करून तुमचे क्रेडिट कार्डचे बिल भरू शकतात.