DA Hike Update:- केंद्र सरकारी कर्मचारी असो किंवा राज्य सरकारी कर्मचारी यांच्याकरिता महागाई आणि घरभाडे भत्ता या गोष्टी खूप महत्त्वाच्या असून यांचा सरळ संबंध हा कर्मचाऱ्यांच्या पगाराशी येतो. जर आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये एक जुलै 2024 पासून पुन्हा एकदा वाढ करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
आपल्याला माहित आहेच की या वर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्चमध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली होती व त्याची अंमलबजावणी एक जानेवारी 2024 पासून केली जात होती. परंतु आता पुन्हा जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात वाढ होणार आहे.
तसेच सरकारच्या माध्यमातून जानेवारीमध्ये महागाई भत्ता चार टक्क्यांची वाढ केली होती व त्यामुळे महागाई भत्ता 46% वरून 50% पर्यंत पोहोचला होता. परंतु आता केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाले आहे व त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणखी पाच टक्क्यांची वाढ होऊन ती 55 टक्क्यांपर्यंत होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एक जुलैपासून महागाई भत्ता होणार 55%?
सध्याच्या महागाईचा दर किंवा महागाई पाहिली तर त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून महागाई भत्त्यात पाच टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता असून जर ही वाढ केली तर एक जुलैला कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% होईल. जर आपण केंद्र सरकारचा मागील काही वर्षांचा ट्रेंड पाहिला
तर सरकारने केवळ सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत एक जुलैचा महागाई भत्ता जाहीर केला आहे व यावेळी देखील असेच होईल अशी अपेक्षा आहे. सरकारच्या माध्यमातून जेव्हा यासंबंधीची घोषणा केली जाईल तेव्हा ती एक जुलै 2024 पासून प्रभावी मानली जाईल. सध्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे.
कर्मचाऱ्यांच्या इतर सहा भत्त्यांमध्येही होणार वाढ?
सरकारने एक जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यास मान्यता दिली होती व त्यासोबत आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतर सहा भत्त्यांमध्ये देखील लवकरच वाढ होणार आहे. कार्मिक प्रशिक्षण विभागाने 2 एप्रिल 2024 च्या कार्यालयीन ज्ञापनानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते जारी करण्याच्या सूचना जारी केले आहेत व ज्यामुळे हे भत्ते देखील वाढविण्यात आले.
घर भाडेभत्त्यात देखील केली वाढ
जेव्हा महागाई भत्ता 50% पर्यंत पोहोचला तेव्हा केंद्र सरकारच्या माध्यमातून घर भाडे भत्त्यांमध्ये देखील शहरांच्या वर्गवारी म्हणजेच एक्स, वाय आणि झेड प्रमाणे अनुक्रमे 30 टक्के, 20 टक्के आणि दहा टक्क्यांची वाढ केली. म्हणजेच एक्स श्रेणीत असलेल्या शहरांकरिता 27 टक्क्यांवरून 30 टक्के, वाय श्रेणीतील शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना 18 टक्क्यांवरून 20 टक्के आणि झेड श्रेणी तील शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरभाडेभत्त्यात नऊ टक्क्यांवरून दहा टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे.