DA Hike Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांना सणासुदीत मिळणार भेट! महागाई भत्त्यात होणार वाढ, पगार किती वाढणार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DA Hike Update:- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच महागाई भत्ता आणि घरभाडे भत्तावाढ होय. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता अनेक मीडिया रिपोर्ट मधून वर्तवण्यात येत असून गेल्या काही दिवसांपासून याबाबतीत जोरात चर्चा सुरू आहे. यामध्ये जर आपण विचार केला तर साधारणपणे कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे की महागाई भत्त्यातील वाढ ही चार टक्के होईल.

म्हणजेच आता जो कर्मचाऱ्यांना 42% इतका महागाई भत्ता मिळत आहे तो चार टक्के वाढ झाल्यानंतर 46 टक्क्यांपर्यंत होईल. परंतु जर आपण पाहिले तर महागाई भत्त्यातील ही वाढ चार ऐवजी तीन टक्के होणार असल्याची शक्यता असून जर असे झाले तर 42 टक्क्यांवरून वाढून महागाई भत्ता 45 टक्क्यांपर्यंत होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यामुळे खूप फायदा होणार आहे.

 महागाई भत्त्यात होणार वाढ?

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शन धारकासाठी एक आनंदाची बातमी असून या कर्मचाऱ्यांना लवकरच वाढीव महागाई भत्त्याची भेट मिळण्याची दाट शक्यता असून महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणारा 42 टक्के महागाई भत्ता हा तीन टक्के वाढीने 45% इतका वाढणार आहे.

आपल्याला माहित आहेच की केंद्र सरकार वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि निवृत्तीवेतनधारकांचा डीआर म्हणजेच महागाई सवलत वर्षातून दोनदा वाढवण्यात येते किंवा त्यामध्ये सुधारणा करण्यात येते. साधारणपणे ही प्रक्रिया जानेवारी आणि जुलैमध्ये पार पाडली जाते. जर आपण जानेवारीचा विचार केला तर महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आलेली होती.

 केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती होईल वाढ?

जर याबाबत आपण ऑल इंडिया रेल्वे मेन फेडरेशनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांचे मत पाहिले तर त्यांनी म्हटले आहे की, महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता असून आम्ही चार टक्क्यांची वाढ महागाई भत्त्यात  करावी अशी मागणी करत आहोत. जर केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के होईल.

त्यामुळे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे बेसिक म्हणजेच मूळ वेतन जर प्रत्येक महिन्याला 36 हजार पाचशे रुपये असेल तर सध्या त्याचा महागाई भत्ता हा पंधरा हजार तीनशे तीस रुपये आहे आणि जुलै 2023 पासून महागाई भत्ता जर तीन टक्क्यांची वाढ झाली तर डीए 1095 रुपये इतका  वाढणार आहे. म्हणजेच 42% नुसार मिळणारा 15 हजार 330 रुपयाचा महागाई भत्ता हा वाढून 16 हजार 425 रुपये होणार आहे.

तसेच महत्त्वाचे म्हणजे कर्मचाऱ्यांना जुलैपासून महागाई भत्त्याची थकबाकी मिळेल अशी देखील एक शक्यता आहे. जर आपण महागाई भत्त्याच्या थकबाकीचा विचार केला तर कोरोना कालावधीत केंद्र सरकारच्या माध्यमातून एक जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या 18 महिन्यांच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता जारी करण्यात आलेला नव्हता.

एवढेच नाही तर पेन्शन धारकांना दिली जाणारी महागाई सवलत म्हणजेच डीआर पेमेंट देखील करण्यात आलेले नाही. त्यामुळे सरकारचे 34,402 कोटी रुपयांची बचत झालेली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांकडून थकीत भत्ता जारी करण्याची मागणी केली जात आहे. परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे की महागाई भत्त्याची ही थकबाकी दिली जाणार नाही.