Bank FD Interest Rate:- गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा सर्वात विश्वसनीय आणि चांगला परतावा देणारा पर्याय म्हणून ओळखला जातो. साधारणपणे देशातील सर्वच बँकांच्या माध्यमातून एफडी योजना राबवल्या जातात व त्या माध्यमातून आकर्षक असे व्याजदर ग्राहकांना दिले जातात.
बँकांच्या माध्यमातून जो काही व्याजदर दिला जातो तो तुम्ही किती दिवसांसाठी एफडी करत आहात त्यानुसार वेगवेगळा असतो. या अनुषंगाने तुम्हाला देखील एफडी करायची असेल व त्या माध्यमातून चांगला परतावा मिळवायचा असेल तर या लेखामध्ये आपण देशातील काही प्रमुख बँकांचा एफडीच्या कालावधीनुसार व्याजदर बघणार आहोत.
देशातील प्रमुख बँकांचा एफडी कालावधी व त्यानुसार मिळणारा व्याजदर
1- ॲक्सिस बँक- या बँकेत तुम्ही एक वर्षाच्या कालावधीकरिता एफडी केली तर त्यावर 6.70 टक्के दराने व्याज दिले जाते. तसेच तीन वर्ष व पाच वर्ष कालावधी करिता एफडी केली तर अनुक्रमे 7.10% व सात टक्के असे व्याजदर दिले जात आहेत.
2- एचडीएफसी बँक- एचडीएफसी बँकेत जर तुम्ही एक वर्षाकरिता एफडी केली तर एफडी वर 6.7 टक्के तर तीन वर्षाच्या एफडीवर सात व पाच वर्षाच्या एफडीवर सात टक्के व्याजदर दिला जात आहे व 55 महिन्याच्या एफडी करिता 7.40% इतका सर्वोच्च दर दिला जात आहे.
3- बँक ऑफ बडोदा- बँक ऑफ बडोदामध्ये जर तुम्ही एक वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली तर त्यावर 6.85% इतका व्याजदर दिला जात आहे. तर तीन व पाच वर्षाच्या एफडी वर अनुक्रमे 7.5% ते 6.80% इतका व्याजदर दिला जात आहे. विशेष म्हणजे या बँकेच्या माध्यमातून चारशे दिवसांच्या एफडीवर सर्वांच्च 7.30% इतका व्याजदर दिला जात आहे.
4- बँक ऑफ महाराष्ट्र- बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जर तुम्ही एक वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली तर 6.75 टक्के व्याजदर दिला जात आहे तर तीन व पाच वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली तर 6.50% इतका व्याजदर दिला जात आहे. तसेच 333 दिवसांच्या एफडी करिता सर्वांच्च व्याजदर हा 7.40% इतका आहे.
5- सेंट्रल बँक ऑफ इंडिया- सेंट्रल बँक ऑफ इंडिया एक वर्षाच्या एफडीवर 6.85% इतका व्याजदर देत आहेत तर तीन व पाच वर्षाच्या एफडीवर अनुक्रमे 6.75% ते 6.50% इतका व्याजदर देत आहे. विशेष म्हणजे 444 दिवसांची एफडी केली तर सर्वांच्च दर हा 7.45% इतका आहे.
6- पंजाब नॅशनल बँक- पंजाब नॅशनल बँकेत एक वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली तर 6.80% इतका व्याजदर दिला जात आहे. त्यासोबतच तीन व पाच वर्षाच्या एफडीवर अनुक्रमे सात टक्के ते 6.50% इतका व्याजदर दिला जात आहे. विशेष म्हणजे चारशे दिवसांची एफडी केली तर 7.25% इतका सर्वोच्च दर दिला जात आहे.
7- युनियन बँक ऑफ इंडिया- युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जर एक वर्षाची एफडी केली तर 7.80% इतका व्याजदर दिला जात असून तीन व पाच वर्षाच्या एफडीवर अनुक्रमे 6.70% ते 6.50% इतका व्याजदर दिला जात आहे. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये जर 333 दिवसाच्या कालावधी करिता एफडी केली तर 7.40% इतका व्याजदर मिळणार आहे.